KL Rahul Replacement: केएल राहुलच्या दुखापतीने चमकलं 'मुंबईकराचं' नशीब! WTC फायनलसाठी थेट भारतीय संघात संधी

Ishan kishan Replacment Of KL Rahul: केएल राहुलच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे.
ishan kishan
ishan kishan Saam Tv

Team India WTC Squad: सध्या भारतात आयपील २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या २८ मे रोजी रंगणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे.

हा सामना ७ ते ११ जून दरम्यान रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत. कारण संघातील खेळाडू दुखापतीतून बाहेर होताना दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीच केएल राहुल दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे. दरम्यान आता त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे.

ishan kishan
IPL 2023 Points Table: हैदराबादचा एक विजय अन् प्लेऑफचं समीकरणच बदललं; राजस्थानला मोठा फटका

केएल राहुलच्या रिप्लेसमेंटची घोषणा

बीसीसीआयने सोमवारी ट्विट करत केएल राहुलच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. केएल राहुल ऐवजी ईशान किशनची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून वर्णी लागली आहे. अंतिम सामन्यात तो यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतो.

ईशान किशनसाठी ही एक सुवर्णसंधी असू शकते. ईशान किशनने आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.तो सध्या जोरदार फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही महिन्यांपासून तो भारतीयांस संघासाठी सातत्त्याने चांगली कामगिरी करतोय. हेच कारण आहे की, बीसीसीआयने त्याला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest sports updates)

ishan kishan
IPL 2023 Cheerleaders: आता तर हद्दच पार! सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाने चियर लीडर सोबत केलं लाजिरवाणं कृत्य ; VIDEO व्हायरल

केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर..

आयपीएल २०२३ स्पर्धेतील ४३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात केएल राहुल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी चेंडू अडवताना त्याचा पाय घसरला होता.

काही मिनिटे तो मैदानावरच पडून होता. त्यानंतर संघातील इतर खेळाडूंनी खांद्याचा सहारा देत त्याला मैदानाबाहेर नेले होते. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान सध्या तो नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत आहे.

उमेश- उनाकडटवर बीसीसीआयचे लक्ष..

भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज उमेश यादव आणि जयदेव उनाकडटवरही बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेऊन आहे. काही दिवसांपूर्वी जयदेव उनाकडट नेट्समध्ये सराव करत असताना त्याचा तोल गेला होता. ज्यामुळे त्याच्या उजव्या खांदयावर सर्व भार आला होता. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल २०२३ स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. तर उमेश यादववर देखील बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेऊन आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com