KKR vs GT IPL Match: कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरेलल्या कोलकाता नाईट रायडर्सने १८० धावांचं आव्हान गुजरातला दिले होते. गुजरातच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत कोलकातावर मात केली . (Latest Marathi News)
कोलकाताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातची सुरुवात चांगली झाली. गुजरातने सुरुवातीलाच ३ षटकात ३० धावा कुटल्या. कोलकाताच्या हर्षितने तिसऱ्या षटकासाठी १९ धावा दिल्या.
गुजरातला ऋद्धिमानच्या रुपाने धक्का बसला. ऋद्धिमानने १० चेंडूत १० धावा केल्या. ऋद्धिमानने गिलसोबत ४१ धावांची भागिदारी रचली. पुढे कर्णधार हार्दिक पंड्याच्या रुपाने गुजरातला दुसरा धक्का बसला. हार्दिकने २० चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या.
हार्दिकनंतर शुभमनचं अर्धशतक अवघ्या १ धावाने हुकलं. शुभमनने ३८ चेंडूत ४९ धावा कुटल्या. शुभमन बाद झाल्यानंतर मिलर आणि शंकरने संघाची कमान सांभाळली. कोलकाचाच्या वरुण चर्कवर्तीने १७ व्या षटकात २४ धावा दिल्या.
तिथेच सामना फिरला. पुढे शंकर आणि मिलरने धुव्वादार खेळी तशीच ठेवत ७ गडी राखून विजय मिळवला. मिलर आणि शंकरने ८७ धावांची भागीदारी रचली. (Cricket News)
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघ नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यासाठी आला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रहमनुल्लाह गुरबाजने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारले.
तर आक्रमक फलंदाज आंद्रे रसलने २ चौकार आणि ३ षटकार मारले. तर रिंकू सिंगने या डावात १० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने ६ गडी बाद १८९ धावा केल्या होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.