कॅलिफॉर्निया : इंडियन वेल्स टेनिस (Indian Wells) स्पर्धेतील अंतिम सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने (Taylor Fritz) राफेल नदालचा (Rafael Nadal) ३-६, ६-७ (५-७) असा पराभव करीत स्पेनच्या नदालची यंदाच्या हंगामातील विजयी घाेडदाैड राेखण्यात यश मिळविलं. विशेष म्हणजे तब्बल २१ वर्षा नंतर टेलर फ्रिट्झच्या माध्यमातून अमेरिकेकडे (america) इंडियन वेल्सचे अजिंक्यपद (victory) आलं आहे. (rafael nadal latest marathi news)
सामन्याच्या प्रारंभापासून नदालला गुण मिळविण्यात यश आले नाही. ताे ०-४ असा पिछाडीवर राहिला. त्यातच त्याला दुखापत झाल्याने ताे कोर्टच्या बाहेर गेला आणि उपचार घेतले. त्यानंतर नदालने सामन्यावर पकड मिळविण्याचे प्रयत्न केले. परंतु त्याला टेलरने पहिला सेटमध्ये ६-३ असे नमविले.
दुसऱ्या सेटमध्ये नदालने उत्तम खेळ करीत दोन ब्रेक पाँईट मिळवत ५-५ अशी बरोबरी साधली. परंतु टेलरने त्यास प्रत्युत्तर देत (टाय ब्रेकर) सेट जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. दरम्यान आंद्रे आगासी (Andre Agassi) याच्यानंतर टेलर फ्रिट्झ हा इंडियन वेल्स (Indian Wells Trophy) जिंकणारा अमेरिकन खेळाडू ठरला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.