vinesh phogat twitter
Sports

Celebrities on Vinesh Phogat : विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याने सेलिब्रिटी दुखावले; स्टार्स म्हणाले, हे तर षडयंत्र!

Vinesh Phogat News : कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याने सेलिब्रिटींचे मन दुखावले आहे. अनेक सेलिब्रिटींनी हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

Sejal Purwar

मुंबई : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जाणारी भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिला केवळ 100 ग्रॅम वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले. विनेश फोगाट संदर्भातली ही बातमी समोर आल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकांचे ह्रदय तुटले. उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवल्यानंतर 'दंगल गर्ल' आश्चर्यकारक कामगिरी करेल, असा विश्वास भारतीयांना होता. पण सर्व आशा धुळीस मिळाल्या. या घोषणेनंतर विनेशला जितक्या वेदना होत असतील, तितक्याच प्रत्येक भारतीयासह बॉलीवूड स्टार्सनाही होत आहेत. या घटनेवर हार्टब्रेक झालेले सेलिब्रिटी तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

6 ऑगस्टला एकापाठोपाठ एक तीन सामने जिंकून विनेश फोगाटने इतिहास रचला आणि अंतिम फेरीत धडक मारली. 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाच्या कुस्तीपटूचा पराभव केला. पण 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचे कारण देत तिला खेळापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले. स्वरा भास्कर, तापसी पन्नू, फरहान अख्तरपासून ते सोनाक्षी सिन्हा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आयओसीच्या या निर्णयामुळे ‘हिरामंडी’ स्टार सोनाक्षीला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना तिने लिहिले, 'विश्वास बसत नाही. तुला आता कसं वाटत असेल, याची मी कल्पनाही करू शकत नाही. काय बोलावे कळेना. फक्त तू होतीस, आहेस आणि नेहमीच चॅम्पियन राहशील'.

सोनाक्षी पाठोपाठ अभिनेत्री तापसी पन्नूने लिहिले की, "आणखी एक षडयंत्र? हा फक्त योगायोग आहे का? 100 ग्रॅमचे सिद्धांत काय? हे आमचे क्रीडा धोरण आहे का?"

पुढे स्वरा भास्करने देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. 'या 100 आणि ओव्हरवेट कथेवर कोण विश्वास ठेवतो?' या पोस्टसोबत तिने एक तुटलेली लाल हार्ट इमोजीही शेअर केली आहे.

'भाग मिल्खा भाग' या चित्रपटातील अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तरही विनेश फोगाटला सपोर्ट करताना दिसला. कुस्तीपटूचे मनोबल वाढवत फरहानने लिहिले, 'प्रिय विनेश फोगाट... तुम्ही यावेळी किती निराश असाल याची कल्पनाच करता येईल. हे सर्व अशा प्रकारे संपले यामुळे तुमच्यासाठी मन दुखावले गेले आहे. पण कृपया हे तु्म्ही जाणून घ्या की आम्हा सर्वांना तुमचा आणि तुम्ही खेळासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचा खूप अभिमान आहे. तुम्ही नेहमीच चॅम्पियन आणि लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान असाल. हिम्मत ठेवा.

बॉलिवूड अभिनेत्री सोफी चौधरीही या बातमीने खूप दु:खी आहे. ती म्हणाली, 'मी खूप दुःखी आहे आणि खूप रागावली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. 0.1 किलो??? विनेशला कसे वाटले असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही'. या स्टार्सशिवाय इतरही अनेकांनी विनेश फोगाटच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत याला षडयंत्र म्हटले आहे आणि या संदर्भात चौकशी व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT