भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटनं कुस्तीच्या ५० किलोग्रॅम गटात थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विनेश फोगाटनं अभिमानास्पद कामगिरी केली आहे. तिचे देशात प्रचंड कौतुक केले जात आहे. विनेश फोगाटनं युसनेइलिस गुजमैनला हरवून थेट फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. अनेक सेलिब्रिटींनी विनेश फोगाटचं अभिनंदन केलं आहे. मराठी अभिनेता अभिजित केळकरनेदेखील विनेश फोगाटसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिजित केळकरने विनेशसाठी पोस्ट शेअर करत म्हटलंय की, 'आम्ही चुकलो... मानवनिर्मित देवदेवतांची पूजा करत राहिलो, तुझ्यामधील स्त्रीत्त्वाला पायदळी तुडवलं, तुझ्यावर अत्याचार केले, पण तू हरली नाही. तूझी माफी मागायचीही आमची लायकी नाही. तुझ्यामधील स्त्रीशक्तीला सांष्टांग दंडवत...'; असं त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
गेल्या वर्षी देशातील कुस्तीपट्टूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होता. यावेळी विनेश फोगट, साक्षी मलिक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या काळात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता. या कुस्तीपटूंवर लाठीचार्जदेखील केला होता. त्याच पार्श्वभूमीवर अभिजित केळकरने ही पोस्ट शेअर केली आहे.
विनेश फोगाटचा जन्म २५ ऑगस्ट १९९४ रोजी हरियाणातील भिवानी जिल्ह्यात झाला. विनेशचा जन्म कुस्तीपटूंच्या घरात झाला होता.विनेश नऊ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. विनेशने तिचे काका महावीर सिंग फोगट यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते. तिने आजपर्यंत कुस्तीमध्ये अनेक पदके जिंकली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.