Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगाट अपात्र ठरण्यामागे षडयंत्र, कोणी कोणी व्यक्त केली शंका?

Vinesh Phogat Disqualified before Olympic match : विनेश फोगाट वजन वाढल्याने सामन्याआधी अपात्र ठरली आहे. यामुळे विनेश फोगाटवर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढावली आहे.
विनेश फोगाट अपात्र ठरण्यामागे षडयंत्र, कोणी कोणी व्यक्त केली शंका?
Vinesh Phogat Disqualified Saam tv
Published On

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिला कुस्तीपटू विनेश फोगाटचं सामन्याआधी ५० किलो वजनी गटात १०० ग्रॅम वजन जास्त भरलं. त्यामुळे विनेश स्पर्धेत अपात्र ठरली आहे. विनेश १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने स्पर्धेतून बाहेर गेली आहे. त्यामुळे तिला रौप्यपदकही मिळणार नाही. ऑलिम्पिकच्या नियमामुळे विनेशची सुवर्ण पदक मिळवण्याची संधी हुकली आहे. विनेश अपात्र झाल्यानंतर हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप काहींनी केला आहे. अनेकांनी ऑलिम्पिकच्या निर्णयावर शंका व्यक्त केली आहे. फोगाटच्या कुटुंबियांसहित राजकीय नेत्यांनीही निर्णयाबाबत संशय व्यक्त केला आहे.

विनेश फोगाटचे सासरे काय म्हणाले?

विनेश फोगाट अपात्र करण्यावर तिचे सासरे राजपाल राठी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. '१०० ग्रॅम एवढं जास्त असतं का? डोक्यावरील केसाचही वजन तेवढं असतं. या मागे सरकार आणि बृजभूषण शरण सिंह यांचा हात असल्याचा आरोप राठी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राठी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनेश फोगाट अपात्र ठरण्यामागे षडयंत्र, कोणी कोणी व्यक्त केली शंका?
Vinesh Phogat: सुवर्णपदकाची संधी हुकली, विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

खासदार संजय सिंह काय म्हणाले?

आप खासदार संजय सिंह यांनीही विनेश फोगाटवर भाष्य केलं आहे. 'विनेश फोगाटसोबत मोठा षडयंत्र झाला आहे.आधी खेळलेल्या मॅचमधे तिचं वजन योग्य होतं. मग फायनल मॅचला १०० ग्रॅम वजन कसं वाढलं? जी भूमिका तेव्हा सरकारने घ्यायला हवी होती, ती त्यांनी घेतली नाही हे दुर्दैव आहे. भारत सरकारने यात हस्तक्षेप केला पाहिजे. विनेशला न्याय मिळाला नाही, तर मोदींनी ऑलिम्पिकचा बहिष्कार केला पाहिजे, असे खासदार संजय सिंह म्हणाले.

यात काही षडयंत्र आहे का? जयंत पाटील यांचा सवाल

विनेश फोगाटवर जयंत पाटील यांनी भाष्य केलं. 'विनेश फोगाट प्रकरणी काही षड्यंत्र आहे का, काय सूत्र हलली का? कुठून हलली? कशी हलली? यावर शंका निर्माण होत आहे. त्यांना आधी कशी वागणूक दिली गेली, हे माहीत आहे. सरकारने, दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक सर्वांना माहिती आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

विनेश फोगाट अपात्र ठरण्यामागे षडयंत्र, कोणी कोणी व्यक्त केली शंका?
Abhijeet Kelkar Post:'तुझी माफी मागायचीदेखील आमची लायकी नाही...'मराठी अभिनेत्याची विनेश फोगाटसाठी खास पोस्ट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनेश फोगाटवर एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. 'विनेश फोगाटची कारकीर्द चमकदार असून तिने विश्वविजेत्याला पराभूत केले आहे. आजची घटना तिच्या करिअरमधील वाईट अपवाद आहे. ती पुन्हा एकदा पदार्पण करेल, यात शंका नाही. विनेश विजेती होऊन परतेल. आमच्या शुभेच्छा आणि समर्थन नेहमीच सोबत राहील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com