T20 World Cup Semifinal Saam Digital
Sports

T20 World Cup Semifinal : टीम इंडिया थेट फायनलमध्ये जाणार, कसं काय? इंटरेस्टिंग समीकरण वाचा!

IND Vs ENG Semi Final : टी-२० विश्वचषकात २७ जून रोजी गयाना येथे होणाऱ्या भारत-इंग्लंच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हा सामना रद्द झाला तर याचा फायदा भारतालाच होणार असून थेट फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

भारताने टी-२० विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. एकही सामना न गमावता उपात्य फेरी गाठली आहे. उपात्य फेरीत इंग्लंडशी लढत होणार आहे, मात्र गयाना येथे होणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे. जर या सामन्यादरम्यान पावसाने व्यत्यय आणला आणि सामना रद्द झाला तर याचा फायदा इंग्लंडला होणार की एकही सामना न गमावलेल्या भारताला?. कोणता संघ फायनलमध्ये पोहोचणार जाणून घेऊयात.

उपांत्य फेरीतील दोन्ही सामने एकाच दिवशी म्हणजे २७ जून रोजी खेळवले जाणार आहेत. दक्षिण आफ्रीका आणि अफगाणीस्तान यांच्यातील सामना त्रिनिनाद येथे होणार आहे. तर भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार सामना गयाना येथे होणार आहे. या दोन्ही सामन्यांनवर पावसाचं सावट आहे. पण आयसीसीने दोन्ही सामन्यांसाठी वेगवेगळे नियम लावले आहेत. उपांत्य फेरीतील पहिला सामना दक्षिण आफ्रीका आणि अफगाणीस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

याच दिवशी भारत आणि इंग्लंडचा सामना खेळवला जाणार आहे. मात्र हा सामना दक्षिण आफ्रीका आणि अफगाणीस्तान सामन्याच्या एक तास उशिराने सुरू होणार आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड सामन्यात पाऊसाचा व्यत्यय आला तरी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. कोणत्याही परिस्थिती हा सामना खेळवला जाणार आहे. त्या सामन्यासाठी ४ तास १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे, जेणेकरून सामना त्याच दिवशी खेळता येईल.

पण भारतासाठी हा नियम फायदेशीर ठरणार आहे. सामना रद्द झाला तर अव्वल स्थानी असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. त्यामुळे या नियमाचा केवळ भारतालाच फायदा होणार आहे. भारतीय संघ सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानी असून उपांत्य फेरी गाठली आहे. सामना रद्द झाल्यास टीम इंडियाला थेट अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल. तर ग्रुप-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT