T20 World Cup Eng Vs SL, ICC Twitter Saam TV
क्रीडा

T20 World Cup: अखेर इंग्लंड सेमिफायनलमध्ये, श्रीलंका पराभूत; ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट

इंग्लंडने श्रीलंकेला पराभूत करून टी २० वर्ल्डकपमध्ये सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Nandkumar Joshi

T20 World Cup, Eng vs SL : इंग्लंडने श्रीलंकेला पराभूत करून टी २० वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, हा ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आता भारतानं झिम्बाब्वेच्या विरुद्ध सामना जिंकला तर, सेमिफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

श्रीलंकेनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता. श्रीलंकेच्या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर निसांकाने ६७ धावा ठोकल्या. तर कुसल मेंडिस याने १८ धावा केल्या. दहा षटकांपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या चांगली होती. मात्र, त्यानंतर श्रीलंकेच्या मधल्या फळीतील आणि अखेरच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४१ धावाच करता आल्या. (Cricket News)

श्रीलंकेचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीवीर बटलर आणि हेल्स यांनी चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात इंग्लंड सहज विजयी होईल असे वाटले होते. मात्र, संघाच्या ७५ धावा असताना बटलरच्या रुपानं पहिला झटका मिळाला. त्यानंतर हेल्सनं बाजू सावरून घेतली. मात्र, तो लगेच ८२ धावा असताना बाद झाला. त्यामुळं २ बाद ८२ अशी अवस्था झाली. (T 20 World Cup)

बेन स्टोक्सनं एका बाजूने किल्ला लढवला. त्याने ४२ धावा केल्या. मात्र, इंग्लंडला मधल्या फळीतील फलंदाजांनी निराश केले. ब्रुक, लिंग्विस्टन, मोईन अली, सॅम करन हे स्वस्तात माघारी परतले. त्यामुळे पुन्हा सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकला.

अखेरच्या षटकांमध्ये सामना अटातटीचा झाला. शेवटच्या षटकात इंग्लंडला पाच धावांची गरज होती. त्यातही चुरस निर्माण झाली. रोमहर्षक अशा सामन्यात अखेरच्या षटकात वोक्सने विजयी षटकार खेचला आणि सेमिफायनलमधील स्थान निश्चित केले. या विजयासह इंग्लंड सेमिफायनलमध्ये पोहोचला. आता ग्रुप १ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड हे सेमिफायनलमध्ये पोहोचले आहेत.

ऑस्ट्रेलिया बाहेर

श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्या सामन्याआधी ग्रुप १मध्ये न्यूझीलंड पहिल्या, तर ऑस्ट्रेलिया प्रत्येकी सात गुणांसह दुसऱ्या स्थानी होता. सेमिफायनलमधील प्रवेश हा इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील निकालावर अवलंबून होता. मात्र, इंग्लंडनं श्रीलंकेला पराभूत केले. इंग्लंडचे सात आणि ऑस्ट्रेलियाचेही सात गुण झाले आहेत. मात्र, नेट रनरेटने इंग्लंडची सरशी झाली आणि ते सेमिफायनलमध्ये पोहोचले. तर यजमान ऑस्ट्रेलिया हा स्पर्धेबाहेर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

SCROLL FOR NEXT