T20 World Cup: टीम इंडिया सेमी फायनलही गाठणार नाही? कपिल देवचं धक्कादायक वक्तव्य

कपिल देव यांच्या मते भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता केवळ 30 टक्के आहे.
Kapil Dev
Kapil Dev Saam Tv

T-20 World Cup : ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असून शकते याबाबत अनेकजण आपली मते मांडत आहेत. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनीही याबाबत भाकीत केले आहे. मात्र त्यांच्या विश्लेषनावरुन टीम इंडियाच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते.

Kapil Dev
T20 World Cup : शाहीन आफ्रिदीनं खतरनाक यॉर्कर टाकला, फलंदाजाला पाठीवरून मैदानाबाहेर न्यावं लागलं

कपिल देव यांच्या मते भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता केवळ 30 टक्के आहे. कपिल देव म्हणतात की मोठ्या स्पर्धांमध्ये संघाचे यश हे त्याच्याकडे असलेल्या ऑलराऊंडर खेळाडूंवर अवलंबून असते. यावेळी त्यांनी हार्दिक पांड्याचे कौतुक केले आणि सांगितले की पांड्याच्या पुनरागमनाने कर्णधार रोहित शर्माला दिलासा मिळाला आहे. (Sports News)

पुढे कपिल देव म्हणाले की, भारताची उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता फारच कमी आहे. T20 क्रिकेटमध्ये आजचा सामना जिंकलेला संघ पुढचा सामना गमावू शकतो. भारत विश्वचषक जिंकण्याची शक्यता काय आहे हे सांगणे फार कठीण आहे. मुख्य मुद्दा हा आहे की संघ सुपर-4 मध्ये स्थान मिळवू शकेल का? मला उपांत्य फेरी गाठण्याची चिंता आहे. त्यानंतरच भविष्याबद्दल काहीही सांगता येईल. मला वाटते की उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता 30 टक्के आहे.

Kapil Dev
T20 वर्ल्डकपआधीच शहांचा पाकिस्तानला जोरदार झटका!, कोट्यवधींचं होणार नुकसान

जर तुमच्याकडे असे ऑलराऊंडर खेळाडू असतील जे केवळ विश्वचषकच नव्हे तर इतर सामने आणि स्पर्धांमध्येही जिंकू शकतात, तर यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असेल. हार्दिक पांड्यासारखा खेळाडू टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. संघासाठी सर्व फेऱ्या खूप महत्त्वाच्या असू शकतात. हार्दिकसह रोहितला सहावा फलंदाज मिळाला. एक उत्तम फलंदाज असण्यासोबतच तो एक चांगला गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक देखील आहे, असं कपिल देव यांनी म्हटलं.

पुन्हा भारत-पाकिस्ताना आमने-सामने

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया वर्षभरानंतर पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दुबईत गेल्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला होता. विश्वचषकात भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी दोन्ही संघ मेलबर्नच्या मैदानात उतरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com