Captain Suryakumar Yadav likely to make key changes in Team India’s playing XI ahead of the T20 World Cup 2026 Super 8 clash against Zimbabwe national cricket team. saam tv
Sports

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियात होणार धक्कादायक उलटफेर, मॅचविनर खेळाडूची विकेट पडणार

IND vs ZIM T20 World Cup: विश्वचषक स्पर्धेच्या सुपर ८मध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना २६ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्यात येतील.

Bharat Jadhav

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सूपर ८ चे सामने सुरू आहेत. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट उपांत्य फेरीत जाणार आहे. सुपर८ मधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला होता. आता भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी सामना होणार आहे. या सुपर ८ सामन्यात भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जाणार की नाही हे कळणार आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय संघाने रणनीती आखली आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. किमान दोन बदल आधीच स्पष्टपणे दिसून येत आहेत, परंतु कर्णधार सूर्यकुमार यादव काय निर्णय घेणार हे येणारा काळच सांगेल.

टीम इंडिया आपला पुढचा सुपर८ चा सामना २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दिवशी चेन्नईमध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होईल. सामना संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. त्याच्या अर्धातास आधी टॉस होईल. दरम्यान टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाच्या सलामी जोडीने आतापर्यंत एकाही सामन्यात चांगली कामगिरी केलेली नाहीये. अभिषेक शर्मापासून ते इशान किशनपर्यंत सर्वांना धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. दरम्यान संजू सॅमसनला एका सामन्यात संधी मिळाली होतीय. त्यात त्याने फंलदाजीची चांगली सुरुवात केली होती.

मधल्या फळीतील क्रमवारी बदलणार

भारतीय संघ एकाच वेळी तिन्ही खेळाडूंना संधी देऊ शकतो. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन पुन्हा सलामीसाठी येतील. तर इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते. इशान तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने, तिलकला चौथ्या क्रमांकावर आणि सूर्याला पाचव्या क्रमांकावर जावे लागेल. या सामन्यातून रिंकू सिंगला वगळले जाऊ शकते. पण दरम्यान रिंकू सिंगचे वडील आजारी होते, म्हणून त्यांनी एक दिवस आधीच संघातून बाहेर परतला होता, पण आता ते परतत असल्याचे कळले आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास जेव्हा रिंकू सिंग फलंदाजीसाठी आला आहे तेव्हा त्याने खूप कमी चेंडूंचा सामना केलाय.

तो गोलंदाजीही करत नाही. अशा परिस्थितीत डावखुऱ्या रिंकूला वगळता उजव्या हाताचा फलंदाज संजूला संधी दिली जाऊ शकते. यामुळे पहिल्या तीनमध्ये डावखुऱ्या फलंदाजांची कमतरता काही प्रमाणात कमी होईल. आणखी एक बदल होईल, तो म्हणजे,वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळू शकते. पहिल्या तीन सामन्यात पटेलने सहा विकेट्स घेतल्या, पण त्याला अचानक वगळण्यात आले आणि सुंदरला संघात आणण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी पश्चिमेतील एलबीएस मार्गावर चारचाकी वाहनाने अचानक घेतला पेट

लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव वापरून 30 लाखांची खंडणी; मुंबई पोलिसांची कारवाई,चौघांच्या मुसक्या आवळल्या

अंबानींना मोठा दणका! मुंबईतील 3 हजार कोटीच्या घरावर ईडीची जप्ती; देशात खळबळ

Haryana: धक्कादायक! सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत IAS अधिकाऱ्याच्या सचिवाने संपवलं जीवन

Celebrity Health: वाढदिवसाच्या दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शकाला हार्ट अटॅक? रुग्णालयात दाखल; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT