T20 World Cup 2024 Schedule 
Sports

T20 World Cup 2024 Group A Schedule: T20 विश्वचषक 2024 चं वेळापत्रक जाहीर; कधी होणार भारत-पाकिस्तानचा हायहोल्टेज सामना

T20 World Cup 2024 Schedule: ICC पुरुष टी२० विश्वचषक २०२४चा थरार एक महिना पाहायला मिळणार आहे. यावेळी या विश्वचषकाचं यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडे असणार आहे. दोन्ही देशात या स्पर्धेचे सामने होणार आहेत.

Bharat Jadhav

टी२० विश्वचषक २०२४ चं वेळापत्रक जाहीर झालं आहे. जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून या सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. क्रिकेट प्रेमींच्या हृदयाची धक-धक वाढवणारा भारत-पाकिस्तानचा सामना ९ जूनला होणार आहे. दरम्यान ही स्पर्धेचं अमेरिकेसह वेस्ट इंडिजही यजमानपद भूषवणार आहे.

वेळापत्रकानुसार,१ जूनपासून सुरू होणाऱ्या ICC पुरुष टी२० विश्वचषक २०२४ मध्ये यजमान युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा यांच्यासह भारत आणि पाकिस्तानचा संघ अ गटात आहे. या स्पर्धेत तब्बल २० संघ विश्वकप जिंकण्यासाठी एकमेकांसोबत दोन हात करणार आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ विश्वचषकाच्या सुपर-८ टप्प्यासाठी पात्र ठरतील.

याआधी ग्रुप स्टेजमध्ये रॉबिन फॉरमॅटमध्ये सर्व संघ आमनेसामने येतील. अ गटातील सर्व सामने केवळ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) मध्ये खेळवले जाणार आहेत. टी२०विश्वचषक २०२४ अधिकृतपणे १ जून रोजी टेक्सासमधील दलाल येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने सुरू होतील. तर सेमीफायनल २६ आणि २७ जून रोजी ब्रायन लारा क्रिकेट अकादमी आणि गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. तर टी२०विश्वचषकाचा अंतिम सामना २९ जून रोजी केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे होणार आहे

टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शुक्ल पंचमीनिमित्त आजचा शुभ दिवस; कोणत्या राशींना आर्थिक फायदा?

Maharashtra Live News Update : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका - माजी मंत्री महादेव जानकर

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT