Suved Parkar saam tv
Sports

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पदार्पणातच द्विशतक ठाेकणारा सुवेद पारकर ठरला मुंबईचा दुसरा फलंदाज

आज सुवेद पारकरने यशस्वी पल्ला गाठला.

Siddharth Latkar

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत (ranji trophy) मुंबईचा (mumbai) सुवेद पारकर (suved parkar) पदार्पणातच द्विशतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापुर्वी ही किमया पारकर याचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार (Amol Mujumdar) यांनी साधली हाेती. (Suved Parkar becomes the 12th Indian to score double on FC debut)

पारकरने उपांत्यपूर्व फेरीत खेळाच्या दुसऱ्या दिवशी उत्तराखंडच्या स्वप्नील सिंगच्या चेंडूवर लाँग-ऑफला टॅप करून ३७५ चेंडूत ही धावसंख्या गाठली. त्याने १७ चौकारांसह तीन षटकार ठाेकलेत. एकाच डावात २०० पेक्षा अधिक धावा करणारा तो १२ वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

संघासाठी योगदान देणे हे माझे कर्तव्य असून हा माझा पहिलाच सामना आहे. ताे माझ्यासाठी खास ठरला असे पारकर याने सोमवारी शतक झळकावल्यानंतर नमूद केले हाेते. आज त्याने द्विशतक ठाेकताच त्याच्यावर क्रिकेटप्रेमीनी समाज माध्यमातून काैतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

Hantavirus Symptoms: 'हंटा व्हायरस' म्हणजे काय? शरीरात कसा परसतो? 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

SCROLL FOR NEXT