मुंबई : काेराेनाच्या महामारीमुळे गत दोन वर्षांपासून थांबलेली पाणी पूरवठाच्या (water supply) करात (tax) यंदा बृहन्मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) वाढ करण्याचे नियाेजन केले आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा आढावा बीएमसी (BMC) घेत असून, त्यानंतर नेमकी किती वाढ करावी याबाबत निश्चित केले आहे जाणार आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा बीएसएसी पाणीपट्टी सहा ते सात टक्क्यांनी वाढवेल अशी चिन्ह आहेत. (bmc water tax latest marathi news)
महापालिकेतील एका विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "पाणीपट्टी वाढणार हे निश्चित आहे. त्यावर सध्या काम सुरु आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही निष्कर्षापर्यंत पाेहचून. पाणी स्वच्छ पूरविले जावे यासाठी आम्ही यंत्रणा राबवित असताे. त्याच्या खर्चाचा विचार तसेच जलवाहिनी टाकणे आणि त्याच्या दुरुस्तीच्या खर्चाचा देखील विचार करुन कराची रक्कम निश्चित केली जाईल.
वाढीव पाणीपट्टी किती असावी याबाबतचा प्रस्ताव तयार करून ताे प्रशासनास सादर केला जाईल. प्रशासनाने त्यास मंजुरी दिल्यानंतर नवीन कर आकारणी केली जाईल असेही अधिका-याने स्पष्ट केले. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेस एक महिना लागेल असेही त्यांनी नमूद केले.
या नियाेजीत दरवाढीस काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी राजा यांनी ट्विट करुन विराेध दर्शविला आहे. ते लिहितात "बीएमसी प्रशासनाकडून पाणी करात संभाव्य वाढ करण्याच्या चर्चा आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. मुंबईकर आधीच महागाईमुळे ताणतणावात आहेत. त्यात पाण्यासारख्या मुलभूत गरजांवर तुम्ही त्यांच्यावर अधिक कराचा बोजा टाकू नये.
दरम्यान पाणीपट्टी वाढीचा फटका उत्पादन (manufacturing) आणि बांधकाम उद्योगांना (construction industries) बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. BMC सध्या घरगुती वापरासाठी सहा रुपये प्रति हजार लिटर आणि उद्योग आणि बांधकाम व्यवसायासाठी ५० रुपये आकारते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.