- सचिन कदम
रायगड : रायगडच्या (raigad) सहाय्यक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र साटम (shailendra satam) याला नवी मुंबईच्या (navi mumbai) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (anti corruption bureau) ३० हजार रुपयांची लाच (bribe) घेताना रंगेहात पकडले. साटम याच्या कार्यालयातील टेबलाची झडती घेतली असता पाच लाख ६३ हजार रुपये सापडले. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली असून साटम याची कसून चाैकशी सुरु आहे. (navi mumbai acb latest marathi news)
नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जागेच्या कामाबाबत तक्रारदाराकडून साटम याने पाच लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील ३० हजार रुपयांचा हप्ता घेताना साटम नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला.
एसबीने (acb) दिलेल्या माहितीनूसार तक्रारदार यांचा कन्सस्लटिंगचा व्यवसाय आहे. ते एमआयडीसीतील प्लॉटचे डॉक्यूमेंट एज्युडीकेशन संबंधीचे काम त्यांना प्राप्त अधिकार पत्रानव्ये करीत असतात. तक्रारदार यांच्याकडे एज्युडीकेशन कामाकरिता आलेल्या तीन फाईल्स त्यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा केल्या होत्या.
त्या फाईलचे एज्युडीकेशन करण्यासाठी अलिबाग येथील सहजिल्हा निंबधक तथा मुद्रांक जिल्हाअधिकारी साटम यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी रात्री साटम याच्या कार्यालयात सापळा रचून त्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.