मुंबई : नॉर्वे बुद्धिबळ (chess) स्पर्धेत विश्वनाथन आनंदने (Viswanathan Anand) जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनचा (Magnus Carlsen) पाचव्या फेरीत पराभव करुन भारतीयांना (indian) जल्लाेष करण्याची संधी दिली. आनंदने कार्लसनला 50 चालींत पराभूत केले. या स्पर्धेत दहा गुणांसह आनंद अव्वल स्थानी पाेहचला आहे. (viswanathan anand latest marathi news)
या स्पर्धेतील (sports) आणखी चार फे-या शिल्लक आहेत. आनंदने क्लासिकल विभागात लागाेपाठ 3 विजय नाेंदवित दमदार सुरूवात केली हाेती. त्याने फ्रान्सच्या मॅक्सिमी वचियर लाग्राव्हे (Maxime Vachier-Lagrave) , बल्गेरियाच्या व्हेसिलिन टोपालोव (Veselin Topalov) आणि चीनच्या हाओ वँगवर (Hao Wang) विजय मिळवला होता.
चौथ्या फेरीत अमेरिकेच्या विस्लेने (Wesley) त्यास पराभवचा धक्का दिला. मॅग्नस कार्ल्सन 9.5 गुण प्राप्त करीत दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. वेस्ली आणि शाखरियार मामेदयारोव्ह हे तिसरे स्थानावर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.