शिवराज्याभिषेक सोहळा: डोळे दिपवणारा उत्सव, रायगडावर उसळला शिवसागर

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

किल्ले रायगडावर आजच्याच दिवशी म्हणजे ६ जून १६७४ ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता. हा सोहळा तब्बल ९ दिवस चालला होता.

Shivrajyabhishek Sohala | Facebook/@YuvrajSambhajirajeChhatrapati

छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Shivrajyabhishek Sohala Happen On Raigad Fort | Facebook/@YuvrajSambhajirajeChhatrapati

युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या समवेत त्यांनी पायी गड चालण्यास प्रारंभ केला.

Sambhajiraje Chhatrapati On Raigad Fort | Facebook/@YuvrajSambhajirajeChhatrapati

यावर्षी कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने आज लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल होत मोठ्या जल्लोषात राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला.

Shivrajyabhishek Sohala 2022 Photos | Facebook/@YuvrajSambhajirajeChhatrapati

संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते, युवराजकुमार शहाजी छत्रपती आणि लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

Shivrajyabhishek Sohala By Sambhajiraje Chhatrapati | Facebook/@YuvrajSambhajirajeChhatrapati

ढोल-ताशा आणि तुतारीच्या गजरात जल्लोष करण्यात आला. ढोल-ताशाच्या गजरात तलवारी आणि भगवे झेंडे नाचवत शिवप्रेमींनी हा उत्सव साजरा केला.

Shivrajyabhishek Sohala On Raigad Fort | Facebook/@YuvrajSambhajirajeChhatrapati

यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती यांसह युवराजकुमार शहाजी छत्रपती हे या सोहळ्याला उपस्थित होते.

Shivbhakts in Shivrajyabhishek Sohala | Facebook/@YuvrajSambhajirajeChhatrapati

पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर घालण्यात आला.

Sports Anr Art In Shivrajyabhishek Sohala | Facebook/@YuvrajSambhajirajeChhatrapati

गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ झाले. जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन, जागर व काकड आरती झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajiraje Chhatrapati And Yuvrajkumar Chhatrapati in Shivrajyabhishek Sohala | Facebook/@YuvrajSambhajirajeChhatrapati