हिमाचल प्रदेशात साताऱ्यातील बसला अपघात; सहा युवक जखमी, चालक गंभीर

हे युवक अभ्यास दौऱ्यासाठी मनाली येथे गेले हाेते.
accident near mandi in himachal pradesh
accident near mandi in himachal pradeshsaam tv

सातारा : मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील (satara) ट्रेकर्सच्या खासगी बसला हिमाचल प्रदेश येथील मंडी येथे झालेल्या अपघातात (accident) सातारा जिल्ह्यातील सहा युवक (youth) जखमी (injured) झाले आहेत. दरम्यान या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे. (himachal pradesh accident latest marathi news)

याबाबत अधिक माहिती अशी : महाबळेश्वर ट्रेकर्सचे (mahableshwar trekkers) सहा आणि आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendraraje bhosale) रेसक्यू टीमचे सहा आणि इतरत्र ठिकाणचे असे मिळून 51 जण अभ्यास दौऱ्यासाठी हिमाचल प्रदेश (himachal pradesh) येथे गेले होते.

accident near mandi in himachal pradesh
रामराजेंची अवस्था ‘साठी बुद्धी नाठी’ : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

हा अभ्यास दौरा संपल्यानंतर साता-याला परत येत असताना मंडी येथे एक खासगी बस आणि ट्रेकर्सच्या बसचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये काही जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान या अपघातास सातारा जिल्हा परिषदमधील कर्मचारी देखील सामाेरे गेले. या सर्व कर्मचा-यांना अपघातस्थळावरुन अन्य वाहनाने आणण्यात येत आहे. आज (साेमवार) सायंकाळी हे सर्व जण दिल्लीत येतील.

accident near mandi in himachal pradesh
सलीम आणि सलमान खान पितापुत्राला धमकी; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

या अपघातात जखमी झालेला चालक हा मंडी येथील असून ताे गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व प्रवासी आठ जून पर्यत साताऱ्यात दाखल हाेतील अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी माध्यमांशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

accident near mandi in himachal pradesh
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com