टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याची क्रिकेट क्षेत्रात एक वेगळी ओळख आहे. सूर्या कधीही कोणत्या वादात सापडत नाहीत. तो मैदानावर अगदी शांत असतो. कर्णधार म्हणूनही कधी वाद झाला तर तो शांतपणे ती परिस्थिती हाताळतो. मात्र आता एका अभिनेत्रीने एक असा दावा केला आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री खुशी मुखर्जीने हा दावा केला आहे. खुशीच्या म्हणण्यानुसार, क्रिकेटर सूर्यकुमार तिला सतत मेसेज करायचा असं तिचं म्हणणं आहे.
2016 साली सूर्यकुमार यादवचं लग्न झालंय. त्याच्या पत्नीचं नाव देविशा आहे. देविशा आणि सूर्याने बराच काळ डेट केल्यानंतर लग्न केलं होतं. खुशी नुकतीच एमटीव्ही स्पिलिट्सविलामध्ये सहभागी झाली होती. खुशी म्हणाली की, सूर्या मला खूप मेसेज करायचा. मात्र आमच्यामध्ये असलेल्या गोष्टी पुढे गेल्या नाहीत.
एका इव्हेंटमध्ये खुशीला प्रश्न विचारण्यात आला की, ती कोणत्या क्रिकेटरला डेट करू इच्छिते? या प्रश्नाचं उत्तर तिने नाही दिलं. खुशीने सांगितलं की, मला कोणत्याही क्रिकेटपटूला डेट करायचं नाही. माझ्या मागे खूप क्रिकेटर लागले आहेत. सूर्यकुमार मला खूप मेसेज करायचा. आता आम्ही जास्त बोलत नाही. मला त्याच्याशी माझं नाव जोडायचं नाही. मला कोणत्याही लिंक-अप अफवा आवडत नाहीत
सूर्यकुमार यादवने मंगळवारी त्यांच्या पत्नीसह तिरुपतीमधील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. तयांच्या नेतृत्वाखाली भारत पुढील वर्षी २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप खेळेल. यावेळी गेल्या वर्षीप्रमाणे टीम इंडिया विजयाची दावेदार मानली जातेय. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकुमारचा फॉर्म देखील चर्चेचा विषय ठरतोय. मंदिराला भेट देऊन सूर्यकुमारने त्याच्या फॉर्मसाठी आणि टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकावा यासाठी प्रार्थना केल्याची चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.