Suryakumar Yadav Six Instagram
Sports

Suryakumar Yadav Six: एकच मारला कडक मारला! सूर्याच्या 'सुपला शॉट'चा Video जोरदार व्हायरल

Suryakumar Yadav Six Video: सूर्यकुमार यादवने मारलेल्या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Six Video:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या १२९ धावांवर संपुष्टात आला.

या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना सूर्यकुमार यादवने ४९ धावांची तुफानी खेळी करत संघाची धावसंख्या २०० च्या पुढे पोहचवली. या खेळीदरम्यान त्याने एक भन्नाट शॉ मारला ज्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादव हा मिस्टर ३६० म्हणून ओळखला जातो. मैदानाच्या चारही बाजूंना शॉट मारण्यात तो तरबेज आहे. तो वेगवान गोलंदाजाविरुद्ध खेळताना मैदानाच्या कुठल्याही बाजूला षटकार मारु शकतो. यावेळी ही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे.

मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सू्र्यकुमार यादव सुपला शॉट मारताना दिसून येत आहे. तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना इंग्लंडकडून ४६ वे षटक टाकण्यासाठी मार्क वुड गोलंदाजीला आला होता. (Latest sports updates)

मार्क वुड हा इंग्लंडचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने फाईन लेगच्या वरून षटकार मारला. या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ४९ धावांचं बहुमूल्य योगदान दिलं.

या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २२९ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडचा डाव अवघ्या १२९ धावांवर गडगडला. यासह भारतीय संघाने या सामन्यात १०० धावांनी विजय मिळवला .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT