भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत २९ वा सामना सुरू आहे. लखनऊच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाला २२९ धावा करता आल्या आहेत. तर इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २३० धावांची गरज आहे.
टॉप ऑर्डर कोसळला..
या डावात रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी आले होते. शुभमन गिल १३ चेंडूंमध्ये अवघ्या ९ धावा करत माघारी परतला. तर संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली या सामन्यात खातं ही खोलू शकलेला नाही. ९ चेंडू खेळून तो शून्यावर माघारी परतला आहे. शूभमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी होती. मात्र तो ही स्वस्तात बाद होऊन माघारी परतला.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने या डावात ८७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. त्याचं शतक अवघ्या १३ धावांनी हुकलं आहे. तर केएल राहुलने ५८ चेंडूंचा सामना करत ३ चौकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या.
शेवटी सूर्यकुमार यादव संघासाठी संकटमोचक बनून आला. त्याने संघासाठी बहुमूल्य योगदान देत संघाची धावसंख्या २०० च्या पार पोहचवली. त्याने ४७ चेंडूंचा सामना करत ४९ धावांची खेळी केली. (Latest sports updates)
या मैदानावर असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड
या मैदानावर आतापर्यंत १२ सामने खेळवले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ ३ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ९ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे टॉस अतिशय महत्वाचा असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.