उत्तम फलंदाज आणि भारताचा टी २० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याच्यावर जर्मनीतील म्युनिक येथे स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचं त्याने सोशल मीडियावर सांगितलं आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने सर्वाधिक धावा करून दुसरं स्थान पटकावणाऱ्या सूर्यकुमार यादववर जर्मनीच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. जर्मनीतील म्युनिक येथे त्याच्यावर उजव्या बाजूच्या खालच्या पोटाजवळ स्पोर्ट्स हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली असल्याचे त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे.
भारताचा टी २० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याच्यावर झालेल्या शास्त्रक्रियेबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत अपडेट दिली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला,"माझ्या पोटाच्या खालच्या भागात स्पोर्ट्स हार्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मी बरा होत आहे. क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी मी उत्सुक आहे." पुढच्या वर्षीच म्हणजे २०२६ मध्ये होणाऱ्या टी २० क्रिकेट मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. तत्पूर्वी सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.
सूर्यकुमार यादव याने तिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने एक कसोटी, ३७ एकदिवसीय आणि ८३ टी २० सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात ७७३ धावा आणि टी २० मध्ये २५९८ धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके झळकावली आहेत. तो रुग्णालयात दाखल होण्याआधी तो काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई लीग २० स्पर्धेसाठी खेळला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.