Suryakumar Yadav Asia Cup 2025 x
Sports

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव फिट नाहीये का? ओमानविरुद्ध सामन्यात सूर्याने फलंदाजी का केली नाही?

Suryakumar Yadav Asia Cup 2025 : भारत विरुद्ध ओमान सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजी करण्यासाठी आला नव्हता. बॅटिंग पॅड लावूनही त्याने फलंदाजी केली नाही.

Yash Shirke

  • आशिया कप २०२५ मध्ये भारताने ओमानवर विजय मिळवला.

  • सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही.

  • बॅटिंग पॅड लावूनही सूर्यकुमार यादवने फलंदाजी केली नाही.

Asia Cup 2025 मध्ये भारत आणि ओमान या दोन संघांमध्ये शेवटचा लीग स्टेज सामना खेळला गेला. टॉस जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. सुरुवातीला भारताची सामन्यावर पकड होती. पण हळूहळू सामना ओमानच्या बाजूने झुकला. दुसऱ्या डावात भारताने कमबॅक करत २१ धावांनी सामन्यात विजय मिळवला.

भारतीय संघ फलंदाजी करत असताना ओमानच्या गोलंदाजांनी आठ विकेट्स घेतल्या. सर्वसाधारणपणे भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. पण ओमानविरुद्धच्या सूर्या फलंदाजीसाठी मैदानात उतरलाच नाही. बॅटिंग पॅडमध्ये असतानाही त्याने फलंदाजी केली नाही.

सूर्यकुमार यादवने फलंदाजी का केली नाही? टॉस जिंकल्यानंतर सूर्याने फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला हे स्पष्ट केले. आशिया कपमध्ये मागील दोन सामन्यांमध्ये आम्हाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. म्हणून आम्हाला ओमानविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करुन आम्हाला संघाच्या फलंदाजी क्षमतेची चाचणी घ्यायची आहे, असे सूर्या म्हणाला. याच कारणामुळे तो फलंदाजीला आला नाही असे म्हटले जात आहे.

सामन्याच्या पहिल्या डावात भारत आणि ओमान समान स्थितीत होते. भारतीय खेळाडू धावा करत होते. पण दुसऱ्या बाजूला ओमानच्या गोलंदाजांनीही विकेट्स घेतल्या. जतिंदर सिंह आणि आमिर कलीम यांनी ५६ धावांची भागीदारी करत ओमानला चांगली सुरुवात करवून दिली. आमिर कलीमने ४६ चेंडूत ५४ धावा करत सामना ओमानच्या बाजूने झुकवला. त्याच्या विकेटनंतर ओमानची पकड सुटली आणि भारताचा विजय झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Tourism: कोल्हापूरजवळील गुप्त ठिकाण जिथे नवरात्र होते थाटात साजरी

New Districts: राज्यात होणार २० नवीन जिल्हे अन् ८१ तालुके; सरकारचा नेमका प्लॅन काय?

Hair Care: रात्रभर केसांना तेल लावून ठेवणं चांगले की वाईट? जाणून घ्या सत्य

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर करडे येथे भीषण अपघात

Maharashtra Politics: उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठं खिंडार, ५०० हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT