Sunil Gavaskar Mother Passed Away Saam TV
क्रीडा

Sunil Gavaskar : भारत-बांगलादेश टेस्ट सामन्यात कॉमेंट्री करत होते गावस्कर, घरून आली अतिशय वाईट बातमी

सुनील गावस्कर यांच्या आई मीनल गावसकर यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Satish Daud

Sunil Gavaskar Mother Passed Away : भारत बांग्लादेश कसोटी सामन्यांत (Team India) कॉमेंट्री करत असताना, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासाठी अतिशय वाईट बातमी आली. सुनील गावस्कर यांच्या आई मीनल गावसकर यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाचं वृत्त कळताच गावस्कर भावूक झाले. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून मीनल गावस्कर यांची बरी नव्हती. याच कारणामुळे गावस्कर हे आयपीएलच्या गेल्या मोसमात समालोचनासाठी उपस्थित नव्हते. गावस्कर आपल्या आईची काळजी घेण्यासाठी घरी परतले होते. मात्र, रविवारी (25 डिसेंबर) गावस्कर हे बांग्लादेशमध्ये असताना त्यांच्या आईचं निधन झालं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सुनील गावसकर हे समालोचन करत होते. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने सामना जिंकला होता. त्यांना आईच्या निधनाची वार्ता सकाळी माहिती मिळाली होती. त्यानंतरही त्यांनी समालोचन सुरू ठेवत आपले कर्तव्य बजावले.

गावस्कर यांनी आपले दु:ख क्रिडाप्रेमींना जाणवू दिले नाही. त्यामुळे अनेकांनी त्यांना सलाम केल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे. दरम्यान, गावसकर यांच्या आई मीनल या गेल्या एका वर्षापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होत्या. अखेर, त्यांची झुंज रविवारी अपयशी ठरली.

सुनील गावस्कर यांच्याविषयी

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे भारताच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. १९८३ ची विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होतो. गावस्कर यांची कारकीर्द १९७१ ते १९८७ अशी होती. यादरम्यान त्यांनी १२५ कसोटींमध्ये ३४ शतकांसह १०,१२५ धावा केल्या. तसेच, त्यांनी भारतासाठी १०८ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात ३,०९२ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aashti Assembly Constituency : आष्टी मतदारसंघात महायुतीत पेच, सुरेश धस यांचा अजब मार्ग

Karjat News : बनावट सिगारेट बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; ५ कोटीचा मुद्देमाल जप्त, १५ जणांना अटक

Hardik Pandya: हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सला रामराम करणार? ती पोस्ट तुफान चर्चेत

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार?

Akola News : मविआमध्ये ठाकरे गटाचे बंडखोरीचे संकेत, अकोला पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडण्याची मागणी

SCROLL FOR NEXT