Ind Vs Ban : टीम इंडियाची नव्या विक्रमाला गवसणी; बांग्लादेशचा पराभव करून रचला नवा इतिहास

भारत विरुद्ध बांग्लादेशच्या विरोधात दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत दुसरा कसोटी सामना भारताने तीन गडी राखून जिंकला.
Ind Vs Ban
Ind Vs BanSaam Tv
Published On

India Vs Bangladesh News : भारत विरुद्ध बांग्लादेशच्या विरोधात दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत दुसरा कसोटी सामना भारताने तीन गडी राखून जिंकला. सामन्याच्या चौथ्य दिवशी बांग्लादेशच्या १४५ धावांच्या आव्हानाचा सामना करताना टीम इंडियाने ७ गडी गमावून विजय मिळवला. टीम इंडियाने २-० ने कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने बांग्लादेशला पराभूत करून आशियात सलग १८ वा कसोटी सामना जिंकण्याचा विक्रम केला आहे. (Latest Marathi News)

Ind Vs Ban
Ind vs Ban : टीम इंडियाला घाम फुटला, पण जिंकले; बांगलादेशविरुद्धच्या विजयाची ४ कारणे

टीम इंडियाचा (Team India) पराभव मायभूमीत २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता. तेव्हा चार कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१ ने टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यानंतर टीम इंडिया मायभूमीत १५ वेळा जिंकली होती. त्यात श्रीलंकेविरुद्ध दोन वेळा आणि बांग्लादेशच्या विरुद्ध एक वेळा मालिका जिंकली होती.

बांग्लादेशच्या विरोधात एकही कसोटी सामना नाही हरला भारत

भारताने टीम बांग्लादेशविरुद्ध ७ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. बांग्लादेशविरुद्ध २०१५ साली आठवी कसोटी मालिका झाली. मात्र, ही मालिका रद्द करण्यात आली. याव्यतिरिक्त टीम इंडियाने प्रत्येकवेळी बांग्लादेशला पराभूत केले आहे. आज, टीम इंडिया बांग्लादेशविरुद्ध पराभूत झाली असती, तर टीम इंडिया पहिल्यांदा बांग्लादेशविरुद्ध हरली असा इतिहास झाला असता.

Ind Vs Ban
Ind Vs Ban : टीम इंडिया WTC फायनल खेळणार का?; समजून घ्या गणित सोप्या पद्धतीने...

आर. अश्विनने रचला नवा विक्रम

रविचंद्रन अश्विनची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये जाते. कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दुसऱ्या कसोटीत त्याने बॉल आणि बॅटने अप्रतिम खेळ दाखवला आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह अश्विनने 34 वर्षे जुना विक्रमही आपल्या नावावर केला.

रविचंद्रन अश्विन नवव्या क्रमांकावर उतरला आणि ४२ धावांची नाबाद खेळी केली. नवव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना धावांचा पाठलाग करताना कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू बनला. त्याच्यापूर्वी १९८८ मध्ये वेस्ट इंडिजच्या विन्स्टन बेंजामिनने पाकिस्तानविरुद्ध ४० धावा केल्या होत्या. आता अश्विनने हा विक्रम मोडीत काढला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com