Ind vs Ban : टीम इंडियाला घाम फुटला, पण जिंकले; बांगलादेशविरुद्धच्या विजयाची ४ कारणे

Ind vs Ban 2nd Test : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभवाच्या छायेत असलेली टीम इंडिया अखेर जिंकली.
Shreyas Iyer, R Ashwin / Twitter-ICC
Shreyas Iyer, R Ashwin / Twitter-ICC SAAM TV
Published On

Ind vs Ban 2nd Test : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभवाच्या छायेत असलेली टीम इंडिया अखेर जिंकली. टीम इंडियानं तीन विकेट राखून रोमहर्षक लढतीत विजय मिळवला. भारताला १४५ धावांचे आव्हान दिले होते. पण हे माफक आव्हान पार करताना टीम इंडियाच्या दिग्गजांना घाम फुटला होता.

टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळली होती. श्रेयस अय्यर आणि आर अश्विननं अभेद्य भागीदारी रचून विजय मिळवून दिला. या जोडीनं टीम इंडियाला ख्रिसमसची खास भेट दिली.

Shreyas Iyer, R Ashwin / Twitter-ICC
Ind Vs Ban : वाह रे अश्विन-अय्यर...टीम इंडिया टेस्टमध्ये पास; बांगलादेशच्या तोंडून हिरावला विजयाचा घास

दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून टीम इंडियानं मालिकेवरही कब्जा केला. भारतानं दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने आपल्या नावावर केली. या सामन्यात भारताची स्थिती इतकी मजबूतही नव्हती. तरीही विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. जवळजवळ पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या टीम इंडियानं कसा विजय मिळवला आणि या विजयाची कारणे काय आहेत हे जाणून घेऊयात.  (Sports News)

Shreyas Iyer, R Ashwin / Twitter-ICC
Ind Vs Ban : 7, 2, 6, 1...खेळ खल्लास! टीम इंडियाचे दिग्गज कसे ढेपाळले बघा; आता पराभवाचं सावट

श्रेयस अय्यर-आर अश्विनची भागीदारी

आर अश्विन आणि श्रेयस अय्यरची नाबाद भागीदारी हे भारताचे विजयाचे मोठे कारण आहे. आठव्या विकेटसाठी त्यांनी भागीदारी केली. सात विकेट गमावल्याने टीम इंडियावर खूप दबाव होता. ७ बाद ७४ अशी स्थिती होती. पण दोघांनी मैदानात तग धरला आणि भारताला विजय मिळवून दिला. दोघांनी ७१ धावांची नाबाद भागीदारी केली.  (Team India)

श्रेयस अय्यरची चिवट खेळी

श्रेयस अय्यरला या विजयाचं श्रेय द्यायला हवं. पहिल्या डावात आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनं ८७ धावांची महत्वाची खेळी केली होती. रिषभ पंतच्या साथीने त्याने भागीदारी रचली. त्यामुळे पहिल्या डावात टीम इंडियाला ८७ धावांची आघाडी मिळाली होती. तर दुसऱ्या डावात कठीण काळात श्रेयस अय्यरनं टिच्चून फलंदाजी केली आणि भारताला विजय मिळवून दिला.

अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी

अक्षर पटेलनं दुसऱ्या कसोटीत अष्टपैलू कामगिरीचं दर्शन घडवलं. गोलंदाजीसह त्यानं फलंदाजीतही कमाल केली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या डावात त्यानं महत्वाचे तीन मोहरे टिपले. त्यानंतर फलंदाजीसाठी त्याला नाइट वॉचमनच्या रुपानं मैदानात पाठवलं. त्यानंही दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. चौथ्या दिवसापर्यंत तो टिकून राहिला. पुजारा, केएल राहुल हे अपयशी ठरले असताना, त्यानं ३४ धावा केल्या.

अश्विन पुन्हा झळकला

अश्विननंही जबरदस्त खेळ केला. अष्टपैलू कामगिरी केली. पहिल्या डावात त्यानं चार आणि दुसऱ्या डावात त्याने दोन विकेट घेतल्या. याशिवाय फलंदाजीतही टीम इंडियासाठी त्यानं महत्वाचं योगदान दिलं. पराभवाच्या छायेत असताना टीम इंडियाला त्यानं विजय मिळवून दिला आणि हिरो ठरला. दुसऱ्या डावात त्यानं ४२ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. अश्विनला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारही देण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com