Ind Vs Ban : टीम इंडिया WTC फायनल खेळणार का?; समजून घ्या गणित सोप्या पद्धतीने...

ICC WTC Final : आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं ही मालिका भारतासाठी महत्वाची होती.
Team India, WTC Final/BCCI-twitter
Team India, WTC Final/BCCI-twitterSAAM TV
Published On

India Vs Bangladesh, Team India : भारतीय संघानं बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या रोमहर्षक कसोटी सामन्यात विजय मिळवला आणि कसोटी मालिकाही खिशात घातली. टीम इंडियासाठी या लढतीत विजय मिळवणं महत्वाचं होतं.

बांगलादेशनं टीम इंडियाला १४५ धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण बांगलादेशी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फिरकीवर गिरकी घ्यायला लावली होती. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतानं कसोटी मालिका २-० ने जिंकली. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं ही मालिका भारतासाठी महत्वाची होती. (Sports News)

Team India, WTC Final/BCCI-twitter
Ind vs Ban : टीम इंडियाला घाम फुटला, पण जिंकले; बांगलादेशविरुद्धच्या विजयाची ४ कारणे

या मालिकेतील एक पराभव भारताच्या आयसीसी WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरणारं ठरू शकलं असतं. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांच्याशिवाय टीम इंडिया बांगलादेशमध्ये पोहोचली होती. यातील पंड्याच्या व्यतिरिक्त सर्व खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होते. अशावेळी टीम इंडियाला या मालिकेत विजय मिळवणं तितकसं सोपं नव्हतं. पण केएल राहुलच्या नेतृत्वात भारतानं ही मालिका जिंकली आहे. (Team India)

Team India, WTC Final/BCCI-twitter
Virat Kohli Video : चित्त्यासारखा चपळ, पण 3-3 कॅच सोडल्या; विराट कोहलीला झालंय काय?

WTC गुणतालिकेचं काय आहे गणित?

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर WTC गुणतालिका बघितली असता, भारत मजबूत स्थितीत आहे. १४ सामन्यांत आठ विजय आणि चार पराभवांसह ९९ गुण आहेत. तर ५८.९३ टक्के आहेत. टीम इंडिया दुसऱ्या स्थानी कायम आहे. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. त्यांचे १३ सामन्यांत ९ विजय आणि एका पराभवासह १२० गुण आहेत.

गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. त्यांचे ११ सामन्यांत सहा विजय आणि पाच पराभवांसह ७२ गुण आहेत. चौथ्या स्थानी श्रीलंका आहे. १० सामन्यांत पाच विजय आणि चार पराभवांसह ६४ गुण आहेत. इंग्लंड संघ पाचव्या स्थानी आहे. २२ सामन्यांत १० विजय आणि आठ पराभवांसह १२४ गुण आहेत. मात्र, टक्केवारी फक्त ४६.९७ आहे.

टीम इंडिया WTC फायनल खेळू शकेल का?

या विजयानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारत फायनलमध्ये पोहोचण्याचा शर्यतीत आघाडीवर आहे.

पहिल्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियानं आपलं स्थान अधिक मजबूत केलं आहे. दुसऱ्या स्थानासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काट्याची टक्कर आहे. भारताला पुढची कसोटी मालिका आपल्या होम ग्राउंडवर खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही मालिका होणार आहे. या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया ४-० ने जिंकली तर फायनल खेळणे निश्चित आहे.

जर टीम इंडिया ३-१ किंवा ३-० ने मालिका जिंकली तरीही फायनलमध्ये पोहोचू शकते. पण या मालिकेचा निकाल काही वेगळा लागला तर, मग टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित सर्व चार सामने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com