India Vs Bangladesh, Virat Kohli : भारत-बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. पहिल्या डावात भारतानं आघाडी घेतल्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात २३१ धावा केल्या. लिट्टन दास आणि जाकिर हसन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतासमोर १४५ धावांचं आव्हान ठेवलंय.
फिरकीपटू अक्षर पटेल यानं तीन विकेट घेतल्या. पण या दुसऱ्या डावात विराट कोहली चर्चेत राहिला. यामुळं त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतंय. (Sports News)
बांगलादेशचा दुसरा डाव १०० धावांच्या आसपासच आटोपणार असं वाटत होतं. पण बांगलादेशनं २३१ धावा केल्या. भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळं बांगलादेशच्या फलंदाजांना जीवदान मिळालं. जगातील निवडक क्षेत्ररक्षकांमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं, त्या विराट कोहलीनं एक-दोन नव्हे तर, तीन-तीन कॅच सोडल्या.
आता खराब फिल्डिंग करणं भारताच्या अंगाशी आलंय. भारताचे आघाडीचे फलंदाज दुसऱ्या डावात एकापाठोपाठ बाद झाले. भारतावर पराभवाचं सावट आहे. (Virat Kohli)
विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये होते. मात्र, आज विराटची मैदानातील चपळता मंदावलेली दिसली. अक्षर पटेल अनलकी ठरलाय. त्याच्या गोलंदाजीवर लागोपाठ दोन झेल सोडले. लिटन दासला जीवदान मिळालं, त्यानं सर्वाधिक ७३ धावा केल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.