IPL Auction 2023 : आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा मान सॅम करनला मिळाला आहे. पंजाब किंग्जने त्याला १८. ५ कोटी रुपयांना खरेदी केलं. यानंतर त्यानं प्रतिक्रिया दिली. हा लिलावाचा इव्हेंट त्यानं आपल्या गर्लफ्रेंडसोबत बघितला. मिनी ऑक्शनच्या आदल्या रात्री झोप लागली नाही, असं तो म्हणाला.
सॅम करनला पंजाब किंग्जने १८.५ कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतलं. टी २० वर्ल्डकप स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेल्या सॅम करनसाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात बोली लागली होती. शेवटी पंजाब किंग्जने बाजी मारली आणि करनला आपल्या संघात घेतलं. (Sports News)
करन काय म्हणाला?
करननं लिलावात सर्वाधिक रक्कम मिळाल्यानं आनंद व्यक्त केला. स्टार स्पोर्ट्सच्या एका शोमध्ये तो म्हणाला की, मी लिलावाच्या आदल्या रात्री झोपू शकलो नाही. थोडा उत्साही होतो आणि निराशही होतो. मात्र, आता मी खूप खूश आहे. मला या रकमेत खरेदी केल्याचा आनंद आहे. मला एवढी रक्कम मिळेल असा विचारही केला नव्हता. (IPL 2023)
ज्या पंजाब किंग्ज संघातून २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले, त्या संघात पुनरागमन झाल्याचा आनंद आहे. पंजाब किंग्जचं नाव त्यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाब होतं. निश्चित रुपानं ज्या संघातून आयपीएलचा प्रवास सुरू केला होता, तेथेच पुन्हा जाणे माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. तेथे मी इंग्लंडच्या काही सहकाऱ्यांसोबतही राहू शकणार आहे, असंही करन म्हणाला.
गर्लफ्रेंडसोबत ऑक्शन बघितला...
सॅम करननं सांगितलं की, ऑक्शन इव्हेंट कुठे बघावा याबद्दल माहिती नव्हतं. पण मला कुणीतरी लिंक पाठवली. मी गर्लफ्रेंड आणि वडिलांसोबत आयपीएल लिलाव बघितला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.