Siddhi Hande
रोज सकाळी चहासोबत नाश्त्याला काय बनवायचा असा प्रश्न असतो. पौष्टिक आणि झटपट होईल असा पदार्थ महिलांना बनवायचा असतो.
रोज चहासोबत चपाती खाऊनदेखील कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही चपातीला ट्विस्ट देऊ शकतात.
तुम्ही घरीच मसाला चपाती बनवू शकता. ही चपाती चविष्ट आणि पौष्टिकदेखील असते.
फुटाण्याची डाळ, कढीपत्ता, पुदीना, लसूण, जिरं, लाल मिरची पावडर, मीठ, गव्हाचे पीठ, तेल, कोथिंबीर
सर्वात आधी डाळ, कढीपत्ता, पुदीना, आलं-लसूण हे सर्व मिक्सरला बारीक करुन घ्या.
याची बारीक पावडर झालेली असावी. जेणेकरुन ती दाताखाली येणार नाही.
यानंतर नेहमीप्रमाणे गव्हाच्या पीठाची चपाती बनवून घ्या. त्यावर चमचाभर तेल लावा.
यानंतर या चपातीवर मसाला लावा. हा मसाला पूर्ण चपातीवर नीट पसरवून घ्या. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
यानंतर या मिश्रणाचा उंडा करावा. त्यानंतर पुन्हा चपातीसारखी लाटून घ्या.
तव्यावर मंद आचेवर ही चपाती भाजून घ्या. तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता.