sunil gavaskar saam tv
Sports

Champions Trophy: भारताने फायनल गाठली, पण सुनील गावसकर नाराज; या कारणामुळे रोहित -गिलला झापलं

Sunil Gavaskar On Rohit Sharma: भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट़्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र तरीही सुनील गावसकर नाराज आहेत.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनलचं तिकीट मिळवलं. दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. भारताने या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत, असं असतानाही भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर निराश असल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर सुनील गावसकर नाराज

सुनील गावसकर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' रोहित शर्मा आणि शुभमन गिल गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. दोघेही संघर्ष करताना दिसून येत आहेत.

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या १० षटकात विकेट्स घ्यायला हवं. भारतीय गोलंदाजांना धावांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यात यश येतंय, पण त्यांना विकेट्स काढता येत नाहीये. यात सुधारणा केली, तरच भारतीय संघ फायनल जिंकू शकतो.'

तसेच ते पुढे म्हणाले की, ' तुम्ही जर भारतीय सलामीवीर फलंदाज पाहिले, तर त्यांनी संघाला अपेक्षेप्रमाणे सुरुवात करुन दिलेली नाही. मला वाटतं इथे सुधारणा व्हायला हवी. नवीन चेंडूने गोलंदाजी करतानाही, सुरुवातीच्या १० षटकांमध्ये कमीत कमी २ ते ३ विकेट्स मिळायला हवेत. मात्र असं होत नाहीये.

मधल्या षटकांमध्ये आपले गोलंदाज विकेट्स घेण्यात अपयशी ठरत आहेत. आपल्या गोलंदाजांना धावांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यात यश आलं आहे, पण हे गोलंदाज विकेट्स घेऊ शकलेले नाहीत. या क्षेत्रात सुधारणा केली, तर भारतीय संघाची फायनल जिंकण्याची शक्यता आणखी वाढेल.'

भारतीय संघाने काय करावं?

भारतीय संघाला सल्ला देताना सुनील गावसकर म्हणाले की, ' माझ्या मते भारतीय संघाने ४ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरावं. आता बदल करण्याची काय गरज. वरुण आणि कुलदीप संघात असल्यामुळे दिसून आलंय की, ते विरोधी संघावर भारी पडू शकतात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT