Champions Trophy: भारत- न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला, तर चॅम्पियन कोण होणार? पाहा समीकरण

ICC Champions Trophy Final Scenario: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर चॅम्पियन कोण होणार?
Champions Trophy: भारत- न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला, तर चॅम्पियन कोण होणार? पाहा समीकरण
ind vs nzsaam tv
Published On

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना रंगणार आहे. हा सामना रविवारी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे.

भारताने या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना पावसामुळे रद्द झाला, तर ट्रॉफी कोणाला मिळणार? जाणून घ्या.

Champions Trophy: भारत- न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला, तर चॅम्पियन कोण होणार? पाहा समीकरण
Ind vs Aus : विराट कोहली बाद होताच केएल राहुलची 'ती' रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा व्हिडीओ

फायनलच्या सामन्यात जर पावसाने हजेरी लावली, तर शक्य होईल तितके षटकं कमी करुन सामना खेळवला जाऊ शकतो. आयसीसीच्या नियमानुसार, फायनलचा सामना कमीत कमी २० षटकांचा खेळवणं गरजेचं आहे.

प्रत्येक संघाला २०-२० षटकं दिली जातील. हा सामना ९ मार्च म्हणजे रविवारी खेळवला जाणार आहे. मात्र सामना जर या दिवशी पूर्ण होऊ शकला नाही, तर १० मार्चला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. यादिवशी सामना खेळवला जाऊ शकतो.

Champions Trophy: भारत- न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला, तर चॅम्पियन कोण होणार? पाहा समीकरण
Ind vs Aus: वर्ल्डकप पराभवाची व्याजासह परतफेड! ऑस्ट्रेलियाला लोळवत भारताची फायनलमध्ये धडक

सामना बरोबरीत सुटल्यास काय होणार?

जर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलचा सामना बरोबरीत सुटला, तर नियमानुसार, सुपर ओव्हरनुसार, सामन्याचा निकाल लावला जाईल. दोन्ही संघांना १-१ षटक दिलं जाईल. जो संघ हा सामना जिंकेल, तो चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरेल.

Champions Trophy: भारत- न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला, तर चॅम्पियन कोण होणार? पाहा समीकरण
Champions Trophy Final: ठरलं! भारत- न्यूझीलंड फायनलमध्ये भिडणार; केव्हा, कुठे अन् कधी होणार सामना?

भारत- न्यूझीलंडमध्ये रंगणार रोमांचक सामना

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. त्यामुळे फायनलमध्ये दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळू शकतो. भारतीय संघ साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे.

भारताने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात बांगलादेश त्यानंतर पाकिस्तान आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. त्यानंतर सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com