
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. रोहित- गिलची दमदार सुरुवात, त्यानंतर अय्यरचं वादळी अर्धशतक आणि शेवटी विराटने शतकी खेळी करत भारतीय संघाच्या विजयाचा कळस चढवला.
या विजयासह भारतीय संघाने जवळजवळ सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. यासह न्यूझीलंडला देखील सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे.
पाकिस्तनविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने १११ चेंडूंचा सामना करत नाबाद १०० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ९०.०९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ७ चौकार खेचले. या खेळीच्या बळावर त्याची प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र असं असूनही माजी भारतीय फलंदाज सुनील गावसकर विराट कोहलीवर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.
सुनील गावसकर विराट कोहलीवर का भडकले, याचं कारण समजलं तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने शानदार शतकी खेळी केली. मात्र या खेळीदरम्यान एक मोठी चूक केली होती. ज्यामुळे तो शतक करण्यापूर्वीच बाद होऊ शकला असता. विराट ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड नियमानुसार बाद होऊ शकला असता. मात्र त्याला जीवदान मिळालं.
ज्यावेळी हे घडलं, त्यावेळी सुनील गावसकर समालोचकाच्या भूमिकेत होते. सुनील गावसकरांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'त्याला (विराटला) चेंडू अडवण्याची काहीच गरज नव्हती. तो नशिबवान आहे, कोणीच अपील केली नाही.' असं झालं असतं तर विराट कोहली ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड नियमानुसार बाद झाला असता. विराटचं शतक तर हुकलंच असतं, यासह पाकिस्तानला सामन्यात कमबॅक करण्याची संधीही मिळाली असती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.