akash madhwal  saam tv
Sports

Akash Madhwal Success Story: इंजिनियर काहीही करू शकतो! B.Tech ची नोकरी सोडली अन् टेनिस क्रिकेटर बनला मुंबईचा वंडर बॉय

Who Is Akash Madhwal: उत्तराखंडचा एक नॉर्मल मुलगा मुंबईचा वंडर बॉय कसा झाला? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Akash Madhwal: आयपीएल २०२३ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबईच्या नवख्या गोलंदाजानं मैदान मारलं.

मुंबईत जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह नाही त्यामुळे मुंबईचा बॉलिंग अटॅक कमकुवत आहे असे म्हटले जात होते. मात्र असं मत असणाऱ्यांना आकाश मधवालने चांगलीच चपराक दिली आहे. २१ चेंडू फेकून त्याने अवघ्या ५ धावा खर्च केल्या आणि ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. दरम्यान उत्तराखंडचा एक नॉर्मल मुलगा मुंबईचा वंडर बॉय कसा झाला? जाणून घ्या.

इंजिनियरिंग नंतर लागली क्रिकेटची ओढ..

आकाश मधवालचा जन्म २५ नोव्हेंबर १९९३ रोजी उत्तराखंड मधील रुडकी येथे झाला. त्याचे वडील भारतीय सैन्यात आहेत. तशी लहानपणापासून त्याला क्रिकेट खेळण्याची आवड होती. मात्र आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचे पाय प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याकडे वळले. त्याने आधी इंजिनीरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर क्रिकेटचा सराव करायला सुरुवात केली. सुरुवातीला तो केवळ टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा. वयाच्या २४ व्या वर्षी त्याने पहिल्यांदा लेदर बॉल हातात घेतला.

उत्तराखंड संघात निवड..

आकाश मधवालने कुठलीही क्रिकेट ट्रेनिंग घेतली नव्हती. एक दिवस उत्तराखंडमध्ये क्रिकेटचे ट्रायल्स सुरू होते, तिथे आकाशने हजेरी लावली. त्याने आपल्या गोलंदाजीने प्रशिक्षक मनीष झा यांचं मन जिंकलं. त्यांनी आकाशला आपल्या संघात स्थान दिले. इथूनच आकाशचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्याच्या खेळात सुधारणा देखील झाली. (Latest sports updates)

२०१९ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण...

आकाशने २०१९ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यावर्षी त्याला १० सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने १२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला लिस्ट ए क्रिकेट खेळण्याचा देखील अनुभव आहे. त्याच्या लिस्ट ए क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १७ सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबईने २० लाखात केलं रिटेन...

आकाश मधवालला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांत रिटेन केलं होतं. गेल्या हंगामात त्याला रिप्लेसमेंट म्हणून संधी मिळाली होती. मात्र त्याला मैदानात उतरण्यासाठी वाट पाहावी लागली होती.

या हंगामात जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. त्यामुळे आकाश मधवालला पदार्पण करण्याची संधी मिळाली. ही जबाबदारी तो योग्यरित्या पार पाडतोय. त्याच्या या कामगिरीच्या बळावर मुंबईने क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT