neeraj chopra saam tv
Sports

Neeraj Chopra: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राची हटके स्टोरी!आतापर्यंत देशासाठी जिंकले आहेत इतके मेडल्स

Neeraj Chopra Story, Paris Olympics 2024: येत्या २७ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी जाणून घ्या नीरज चोप्राची स्टोरी.

Ankush Dhavre

ऑलिम्पिक स्पर्धेती ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणं हे कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण केलं भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने. इथून पुढे जेव्हा जेव्हा भालाफेक इव्हेंटचा उल्लेख केला जाईल, तेव्हा नीरज चोप्राचं नाव आदराने घेतलं जाईल. ऑलिम्पिक असेल, कॉमनवेल्थ असेल किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा असेल. या पठ्ठ्याने नेहमीच गोल्डवर निशाणा साधला आहे आणि कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. दरम्यान दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुन्हा एकदा भारताला गोल्ड मेडल जिंकून देण्यासाठी सज्ज झाला आहे.

नीरज चोप्राने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय पहिल्यांदा भारताला पदक जिंकून दिलं होतं. ज्यावेळी त्याने हे मेडल जिंकलं त्यावेळी तो अवघ्या १९ वर्षांचा होता. ज्या वयात इतर मुलं, करिअर कशात करायचं असा विचार करतात. त्याच वयात नीरजने साऊथ एशियन्स गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. इथून त्याने मागे वळून पाहिलंच नाही. एकापाठोपाठ एक इव्हेंट्समध्ये त्याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. २०२१ हे वर्ष त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारं ठरलं. याच वर्षी त्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलं. हे मेडल केवळ त्याच्यासाठीच नव्हे, तर प्रत्येक खेळाडूसाठी अतिशय महत्वाचं होतं. कारण या मेडलमुळे खेळाडूंच्या विश्वासात भर पडली, की आपणही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकतो.

नीरज चोप्राने आतापर्यंत जिंकलेले मेडल

साऊथ एशियन गेम्स- २०१६ - गोल्ड मेडल

एशियन चॅम्पियनशिप -२०१७- गोल्ड मेडल

कॉमनवेल्थ गेम्स - २०१८ - गोल्ड मेडल

एशियन गेम्स- २०१८ - गोल्ड मेडल

टोकियो ओलिम्पिक- २०२० - गोल्ड मेडल

एशियन गेम्स- २०२२- गोल्ड मेडल

डायमंड लीग -२०२२- गोल्ड मेडल

वर्ल्ड चॅम्पियनशिप - २०२२- सिल्व्हर मेडल

भालाफेक हा तसा आधीपासून खेळला जाणारा खेळ आहे. मात्र भालाफेक या इव्हेंटचा १९०८ मध्ये पहिल्यांदा लंडन ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला. तर महिलांच्या भालाफेक या इव्हेंटचा समावेश १९३२ मध्ये झालेल्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेतून करण्यात आला होता. इतक्या वर्षांची प्रतीक्षा संपवत २०२१ मध्ये पहिल्यांदाच या इव्हेंटमध्ये मेडल जिंकता आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT