mohammed shami google
Sports

Mohammed Shami: वर्ल्डकप गाजवणाऱ्या शमीचा मोठा सन्मान! अर्जुन पुरस्कार जाहीर

Mohammed Shami Arjuna Award News In Marathi: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. २०२३ वर्षासाठी केंद्र सरकारकडून क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami Arjuna Award:

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. २०२३ वर्षासाठी केंद्र सरकारकडून क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. (Mohammed Shami Arjuna Award)

अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा पुरस्कार आहे. शमीसह इतर खेळाडूंनाही पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर होताच सोशल मीडियावर त्याचं कौतुक केलं जात आहे. सध्या तो सोशल मीडियावर ट्रेंडिगला आहे.

येत्या ९ जानेवारी २०२४ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार शमीला दिला जाणार आहे. शमीसह २६ खेळाडूंना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी..

मोहम्मद शमी सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये त्याने २४ गडी बाद केले होते. या स्पर्धेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता.

जेव्हा जेव्हा संघाला त्याची गरज असायची तेव्हा तेव्हा तो विकेट्स काढून द्यायचा. तो भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. त्याची क्रीडा क्षेत्रात देशासाठी केलेली कामगिरी पाहून त्याला हा पुरस्कार दिला जाणार आहे. (Latest sports updates)

अशी राहिलीये कारकिर्द..

मोहम्मद शमीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ६४ कसोटी सामन्यांमध्ये २२९ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. यादरम्यान ५६ धावा खर्च करत ६ गडी बाद केले आहेत.

तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं तर त्याने १०१ सामन्यांमध्ये १९५ गडी बाद केले आहेत. यादरम्यान ५७ धावा खर्च करत ७ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर २३ टी-२० सामन्यांमध्ये त्याने २४ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT