indian cricket team  google
Sports

Kedar Jadhav Retirement: T-20 WC सुरु असताना स्टार मराठमोळ्या क्रिकेटपटूची धोनी स्टाईलने निवृत्तीची घोषणा

Kedar Jadhav Retirement News: आयसीसी टी-२० वर्ल्डकप सुरु असताना स्टार भारतीय खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

सध्या अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यावर भर दिला गेला आहे. दरम्यान काही अनुभवी खेळाडूंचं भारतीय संघात कमबॅक करण्याचं दार बंद झालं आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु असतानाच भारताचा स्टार खेळाडू केदान जाधवने आतंरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे.

मराठमोळ्या केदार जाधवने एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची बातमी दिली आहे. त्याने धोनी स्टाईल निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने ज्यावेळी निवृत्ती जाहीर केली होती, त्यावेळी एक नोट शेअर केली होती.

केदार जाधवने वर्ल्डकप २०१९ स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. २०२० मध्ये तो भारतीय संघासाठी आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी मिळाली नव्हती. संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत पाठिंबा आणि प्रेम दिल्याबद्दल त्याने क्रिकेट चाहंत्यांच आभार मानले आहे.

केदार जाधवच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १२२ धावा केल्या. आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळण्याची संधी मिळाली. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा ठरली. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. आयपीएल स्पर्धेत त्याला दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

केदार जाधवने ७३ वनडे सामन्यांमध्ये १३७९ धावा केल्या. ज्यात २ शतकं आणि ६ अर्धशतकांचा समावेश होता. तर आयपीएल स्पर्धेत त्याला ९५ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १२०८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ अर्धशतकं झळकावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी घरावर गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन उघड, कर्वेनगरमधून चौघांना अटक

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT