Dinesh Karthik
Dinesh Karthik  Saam Tv
क्रीडा | IPL

WTC Final 2023: IPL स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप! तरीही WTC च्या फायनलसाठी स्टार भारतीय फलंदाज जाणार इंग्लंडला

Ankush Dhavre

WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ७ ते ११ जून दरम्यान हा सामना लंडनच्या द ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. आता आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत.

तसेच त्यांनी सराव करायला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघासह आणखी एक खेळाडू देखील इंग्लंडला रवाना होणार आहे.

आयपीएल २०२३ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केलेला दिनेश कार्तिक देखील इंग्लंडला जाणार आहे. मात्र तो अंतिम सामना खेळण्यासाठी नव्हे, तर समालोचन करण्यासाठी जाणार आहे.

इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्यात दिनेश कार्तिक समालोचन करताना दिसून येणार आहे. यापूर्वी २०२१ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात देखील तो समालोचन करताना दिसून आला होता.

या सामन्यात दिनेश कार्तिक सह रिकी पाँटिंग, रवी शास्त्री, मॅथ्यु हेडन, जस्टिन लेंगर, सुनील गावस्कर आणि कुमार संगकारा सारखे दिग्गज खेळाडू समालोचन करताना दिसून येणार आहेत. (Latest sports updates)

समालोचन करण्याचा अनुभव..

यापूर्वी देखील भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यावेळी देखील दिनेश कार्तिक समालोचन कक्षाचा भाग होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

केवळ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत नव्हे तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या ॲशेस २०२३ मालिकेत देखील तो समालोचन करताना दिसून येणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ (Team India Squad For WTC Final) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात बर्निंग बसचा थरार; आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी

Eknath Shinde News |मुख्यमंत्र्यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद!

Maharashtra Politics 2024 : भाजपसोबत जाण्याचा कधी आणि का घेतला निर्णय?; प्रफुल पटेलांचा पुन्हा गौप्यस्फोट

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

SCROLL FOR NEXT