indian cricket team saam tv
Sports

India Tour Of Sri lanka: झिम्बाब्वेनंतर टीम इंडिया या देशाचा दौरा करणार! पाहा संपूर्ण वेळापत्रक

India Tour Of Srilanka Schedule: भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दरम्यान हा दौरा झाल्यानंतर भारतीय संघ आणखी एका दौऱ्यावर जाणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना झाला आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डने हे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेला २६ जुलैला सुरुवात होणार आहे .मालिकेतील पहिला सामना २६ जुलै, दुसरा सामना २७ जुलै आणि मालिकेतील तिसरा सामना २९ जुलै रोजी होणार आहे. हे सर्व सामना पीआयसीएस पलेकेलेमध्ये होणार आहे. टी-२० मालिकेतील सामने संध्याकाळी ७ वाजता सुरु होतील.

टी-२० मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना १ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. तर दुसरा सामना ४ ऑगस्ट आणि तिसरा सामना ७ ऑगस्ट रोजी होणार आहे. वनडे मालिकेतील सामने दुपारी २:३० मिनिटांनी सुरु होतील. हे सामने कोलंबोच्या मैदानावर रंगणार आहेत.

कोण होणार कर्णधार?

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली. तर झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. या मालिकेसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. दरम्यान श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान वनडे मालिकेतून रोहित शर्मालाही विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व कोण करणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : माझं कोकण भारी! थंडीत 'या' ठिकाणी पिकनिक प्लान करा

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

SCROLL FOR NEXT