SRH vs RR Qualifier 2 saam tv
क्रीडा

SRH vs RR, Qualifier 2: हैदराबाद-राजस्थान सामन्यात या ५ खेळाडूंच्या कामगिरीवर असतील साऱ्यांच्या नजरा

Players To Watch Out In SRH vs RR Match: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या सामन्यात कोणते ५ खेळाडू चमकणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या क्वालिफायरचा थरार चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला थेट फायनलमध्ये जाण्याचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. दरम्यान या सामन्यात कोणते ५ खेळाडू शानदार कामगिरी करु शकतात? जाणून घ्या. (Players To Watch Out In SRH vs RR Match)

ट्रेविस हेड-

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून सलमीला फलंदाजीला येणाऱ्या ट्रेविस हेडने फलंदाजीत धुमाकूळ घातला आहे. त्याने याच हंगामात अवघ्या ३७ चेंडूंचा सामना करत शतकही झळकावलं आहे. यासह त्याच्या नावे ५ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. राजस्थानविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

यशस्वी जयस्वाल-

राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालसाठी आयपीएल २०२४ स्पर्धा रोलरकोस्टर राईडसारखी राहिली आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघाविरद्ध झालेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यातही त्याने महत्वपूर्ण खेळी केली होती. आज होणाऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

हेनरिक क्लासेन-

सनरायझर्स हैदराबादची सलामी जोडी लवकर बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी हेनरिक क्लासेनवर येते. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हेनरिक क्लासेनने जेव्हा जेव्हा संघाला गरज होती. त्यावेळी त्याने महत्वपूर्ण खेळी केली आहे.

संजू सॅमसन-

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने संघासाठी अनेकदा महत्वपूर्ण खेळी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने यशस्वी जयस्वालसोबत मिळून संघाच्या विजयाचा पाया रचला होता.

अभिषेक शर्मा-

अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडच्या जोडीने सर्वच संघांचीी डोकेदुखी वाढवली आहे. त्याने आतापर्यंत ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र आज होणाऱ्या सामन्यात त्याच्याकडे चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT