SRH vs RR playing 11 prediction sunrisers hyderabad vs rajasthan royals amd2000 twitter
Sports

SRH vs RR: हैदराबादचं वादळ रोखण्यासाठी काय असेल राजस्थानचा 'रॉयल' प्लान? अशी असू शकते प्लेइंग ११

SRH vs RR, Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्याच सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सानमे येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्याच सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सानमे येणार आहेत. हा सामना सनरायझर्स हैदराबादच्या होम ग्राऊंडवर रंगणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने या हंगामात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. सध्या हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाबद्दल बोलायचं झालं, तर भुवनेश्वर कुमारचा जोस बटलर आणि यशस्वी जयस्वालविरुद्ध खेळताना शानदार रेकॉर्ड राहिला आहे. राजस्थान रॉयल्स संघात डाव्या हाताच्या फलंदाजांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हैदराबाद संघात शहबाज अहमदऐवजी मयांक मरकंडेच्या समावेश केला जाऊ शकतो. मात्र राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगली फलंदाजी करतात. त्यामुळे हैदराबादला विचार करुन संघाची निवड करावी लागणार आहे.

राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचं झालं, तर या संघातील गोलंदाजांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. सनरायझर्स हैदराबादचं वादळ रोखायचं असेल, तर राजस्थानच्या गोलंदाजांना या सामन्यातही चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे.

अशी असू शकते सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग ११...

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरीक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक मरकंडे/शाहबाद अहमद, भुवनेश्वर कुमार,जयदेव उनाडकट, टी नटराजन

इ्म्पॅक्ट प्लेअर - अनमोलप्रीत सिंग

या सामन्यासाठी अशी असू शकते राजस्थान रॉयल्स संघाची प्लेइंग ११...

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रोवमेन पॉवेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा.

इम्पॅक्ट प्लेअर- युजवेंद्र चहल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT