heinrich klaasen srh vs lsg x (twitter)
Sports

SRH VS LSG Match Live : नशीबचं खराब राव! गोलंदाज दमले, पण एका चुकीमुळे क्लासेन आउट झाला

SRH VS LSG Live Update : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायटन्स हा सामना हैदराबादमध्ये सुरु आहे. सामन्यामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हेनरिक क्लासेन रन आउट झाला. त्याने फक्त २६ धावा केल्या.

Yash Shirke

SRH VS LSG IPL 2025 : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा आयपीएल सामना रंगात आला आहे. या सामन्यामध्ये लखनऊ संघाचा कर्णधार रिषभ पंत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये लखनऊचे गोलंदाज चमकले आहेत.

फलंदाजी करण्यासाठी हैदराबादचे सलामीवीर मैदानामध्ये उतरले. दुसऱ्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा ६ धावा करुन माघारी परतला, तर इशान किशन शून्यावर बाद झाला. ट्रेव्हिस हेड आउट झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेनने चौकार, षटकार मारत डाव पुढे नेला. पण फॉर्ममध्ये आलेला क्लासेन बॅडलकमुळे बाद झाला.

नेमकं काय घडलं?

अकराव्या ओव्हरमध्ये प्रिन्स यादव फलंदाजीसाठी आला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर नितीश कुमार रेड्डीने जोरदार शॉर्ट मारला. तेव्हा बॉल प्रिन्सचा हाताला लागला आणि नॉन स्ट्राईकच्या स्टंपवर जाऊन आदळला. तेव्हा क्लासेनने क्रीज सोडली होती, त्यामुळे अंपायर्सनी त्याला आउट घोषित केले. चांगल्या फॉर्ममध्ये असताना क्लासेन फक्त २६ धावा करुन तंबूत परतला.

लखनऊची प्लेईंग ११ -

एडन मार्कराम, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव

हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT