Pune Crime News : आधी मैत्री, नंतर ब्लॅकमेल.. व्यापाऱ्याच्या मुलानं स्वतःच्याच घरात केली चोरी, ३३ तोळं सोनं लुटलं

Pune News : व्यापाऱ्याच्या मुलासोबत मैत्री करुन त्याला ब्लॅकमेल केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ३३ तोळे सोने जप्त केले आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

व्यापाऱ्याच्या मुलासोबत मैत्री करुन तिघांनी ३३ तोळे सोने लुटल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात राहणाऱ्या १५ वर्षीय तरुणाला घरातूनच चोरी करायला लावली. त्यानंतर आरोपींनी तरुणाला आणि कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्याचा अल्पवयीन मुलगा आणि तिन्ही आरोपींची एका मित्रामुळे ओळख झाली होती. वयाने मोठ्या असलेल्या आरोपींनी अल्पवयीन तरुणाशी जवळीक साधून त्याच्याशी मैत्री केली. तिघांनी मुलाशी गोड बोलून त्याचा फायदा घ्यायला सुरुवात केली. फिरायला जाण्यासाठी किंवा मौजमज्जा करण्यासाठी ते तरुणाला घरातून पैसे आणायला लावत असत.

Pune Crime News
Pune Swargate ST Depot Case : धक्कादायक! माझ्यावर तिसऱ्यांदा अनैसर्गिक बलात्काराचा प्रयत्न, पीडितेची पत्राद्वारे व्यथा, त्या दिवशी शिवशाहीत काय घडलं?

पैसे संपल्याने आरोपींनी अल्पवयीन तरुणाला घरातून सोने आणायला सांगितले. सुरुवातीला पैसे आणि सोने घेऊन तरुण आला, पण पुढे घरातून चोरी करायला नकार दिल्याने आरोपींनी तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना ठार मारुन टाकू अशी धमकी द्यायला सुरुवात केली. दरम्यान घरातून सोने गायब होत असल्याचे अल्पवयीन तरुणाच्या आजोबांना समजले. त्यानंतर तरुणाने सर्वप्रकार घरच्यांना सांगितला.

Pune Crime News
Pune Swargate Depot Case : तिनं व्रण आणि जखमा सहन केल्यात...; अ‍ॅड असीम सरोदे म्हणाले, शेवटपर्यंत मी तिच्यासोबत, स्वारगेट खटल्यात १ रुपया फी घेणार

पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला. तिन्ही आरोपी चोरलेले सोने विकायला जाणार असल्याची माहिती पोलिसांना कळाली. सापळा रचून पोलिसांनी रेहान शब्बीर कुरेशी, स्टिफन जॉन शिरसाठ आणि रोहीत नवनाथ ओव्हाळ या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी ३३०.९६० ग्रॅम (३३ तोळे ६९० मि.ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४ लाख रोख रक्कम असा एकूण १४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Pune Crime News
Beed News : गुजरातमध्ये वसुली, भीती दाखवून पैसे उकळले, बीडच्या निलंबित PSI रणजित कासलेंचा नवा कारनामा समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com