Travis Head Wicket Video X (Twitter)
Sports

Travis Head Wicket Video : लखनऊची 'डोकेदुखी' प्रिन्सने घालवली, रॉकेट बॉलवर 'अशी' घेतली हेडची विकेट

Travis Head SRH VS LSG : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायटन्स हा सामना हैदराबादमध्ये सुरु आहे. या सामन्यात डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादवने ट्रेव्हिस हेडला आउट केले आहे.

Yash Shirke

SRH VS LSG : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायटन्स ही आयपीएलमधली लढत सध्या सुरु आहे. या सामन्यामध्ये लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळत असल्याने हैदराबादचे पारडे काहीसे जड असल्याचे म्हटले जात होते.

हैदराबाद आणि लखनऊ या आयपीएलच्या आजच्या सामन्यात हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड दोघे फलंदाजीसाठी आले. दुसऱ्याचा ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा ६ धावा करुन बाद झाला. त्यानंतर इशान किशन दुसऱ्याच बॉलवर कॅचआउट होऊन माघारी परतला. त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि नितीश कुमार रेड्डी यांनी डाव पुढे नेला.

सातव्या ओव्हरमध्ये प्रिन्स यादव हा गोलंदाजी करण्यासाठी आला. त्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर ट्रेव्हिस हेड क्लिनबोल्ड झाला. प्रिन्स यादवने टाकलेल्या बॉलवर जोरात शॉट मारायच्या नादात हेडने बॅट फिरवली, पण बॉल मिस होऊन स्टंप्सवर जाऊन आदळला. पहिल्याच सामन्यामध्ये प्रिन्स यादवने महाभयानक ट्रेव्हिस हेडला बाद केले आणि लखनऊच्या खेळाडूंनी मोठा जल्लोष केला.

लखनऊची प्लेईंग ११ -

एडन मार्कराम, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव

हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : नवीन वर्षात मराठी अभिनेत्याला लॉटरी, आलिशान घरासोबत खरेदी केली कार; पाहा VIDEO

Bank Robbery : सांगलीत बँकेवर धाडसी दरोडा, मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरले; २२ लॉकरमधील ९ लाख लंपास

Women Haircut Styles : सणासुदीसाठी महिलांकरिता ट्रेंडी हेअरकट्स, पाहा फोटोज

Maharashtra Live News Update: भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

Rohit Pawar: 'अजित पवार KGF मधील रॉकी भाई'; रोहित पवारांकडून जाहिरसभेत काकांचं कौतुक |Video

SCROLL FOR NEXT