
सध्या भारतात आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरु आहे. २२ मार्चपासून सुरु झालेली ही स्पर्धा २५ मे पर्यंत सुरु राहणार आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळतात. क्रिकेट चाहत्यांना जगभरातील दिग्गज खेळाडूंना एकत्र खेळण्याची संधी मिळते.
त्यामुळे क्रिकेट चाहते हे सामने पाहण्यासाठी तुफान गर्दी करतात. मात्र काही उत्साही फॅन्स आपल्या आवडत्या खेळाडूला पाहून मैदानात धावून जातात आणि खेळाडूला जाऊन मिठी मारतात. मात्र अशा उत्साही फॅन्सवर काय कारवाई होते? हे खूप कमी लोकांना माहित आहे.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये गुवाहटीच्या मैदानावर रोमांचक सामना रंगला. या सामन्यात क्विंटन डी कॉकने ९७ धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात कोलकाताने एकहाती विजय मिळवला
मात्र चर्चेत राहिला, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग. एका फॅनने मैदानात उडी घेतली आणि धावत जाऊन रियान परागला मिठी मारली आणि त्याच्या पाया पडला. आता प्रश्न असा पडतो की, असं काही घडल्यास घुसखोरी करणाऱ्यावर काय कारवाई होते? तर जाणून घ्या.
ताब्यात घेणे आणि दंड
सुरक्षा नियम मोडल्यामुळे पोलिस त्या व्यक्तीला ताब्यात घेतात. संबंधित देशाच्या कायद्यांनुसार मोठा आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो. उदा. इंग्लंडमध्ये "Trespassing" कायद्याअंतर्गत £1,000 (सुमारे 1 लाख रुपये) पर्यंत दंड होऊ शकतो.
स्टेडियममध्ये प्रवेशबंदी
पुढील काही वर्षांसाठी किंवा आयुष्यभरासाठी त्या व्यक्तीला स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये BCCI किंवा ICC त्या व्यक्तीवर क्रिकेटशी संबंधित सर्व कार्यक्रमांना बंदी घालू शकते.
गुन्हा दाखल होण्याची शक्यता
जर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही घटना गंभीर असेल, तर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. काही देशांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांखालीही कारवाई केली जाऊ शकते.
मैदानातील सुरक्षाकर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने बाहेर काढणे
सुरक्षारक्षक त्या व्यक्तीला पकडून मैदानाबाहेर फेकू शकतात. काही प्रकरणांमध्ये शारीरिक हिंसाही होऊ शकते (उदा. ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका याठिकाणी अशा घटनांमध्ये सुरक्षारक्षक कठोर पद्धतीने हस्तक्षेप करतात).
क्रिकेट बोर्ड किंवा संघावर परिणाम
अशा घटनांमुळे आयोजकांवर दंड आकारला जाऊ शकतो. सामन्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.