BCCI Central Contract: IPL सुरु असताना टीम इंडियात वादळ उठणार! गंभीरच्या खास माणसांना घरी बसवणार

BCCI Central Contract: बीसीसीआयकडून लवकरच सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली जाऊ शकते. त्यापूर्वी बीसीसीआय मोठा निर्णय घेऊ शकते.
BCCI Central Contract: IPL सुरु असताना टीम इंडियात वादळ उठणार! गंभीरच्या खास माणसांना घरी बसवणार
gautam gambhirsaam tv
Published On

भारतीय संघाने गेल्या वर्षभरात आयसीसीच्या २ मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. आधी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा, त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतही भारतीय संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

यात जितकं श्रेय भारतीय खेळाडूंचं आहे, तितकंच श्रेय सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचं देखील आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी गौतम गंभीरकडे आहे. गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी दिलीप, मॉर्ने मॉर्कल, रायन टेन डेस्काथे आणि अभिषेक नायर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआय सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कमी करुन नव्या लोकांचा समावेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

BCCI Central Contract: IPL सुरु असताना टीम इंडियात वादळ उठणार! गंभीरच्या खास माणसांना घरी बसवणार
BCCI Central Contract: IPL सुरु असताना रोहित- विराटचं टेन्शन वाढलं! BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआय येत्या ३० मार्चला सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टबाबत निर्णय घेऊ शकते. या दिवशी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. या सामन्यावेळी बीसीसीआयचे सचिव देवजीत साइकीया, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची बैठक होऊ शकते.

दरवर्षी सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी आयपीएल सुरु होण्याआधीच लागू केली जाते. परंतू यावेळी ही यादी जाहीर करण्यात उशीर झाला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमुळे सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर करण्यात उशीर झाला आहे.

BCCI Central Contract: IPL सुरु असताना टीम इंडियात वादळ उठणार! गंभीरच्या खास माणसांना घरी बसवणार
BCCI Central Contract: बीसीसीआयकडून सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर! या १६ खेळाडूंची लॉटरी लागली

विराट- रोहितची सुट्टी होणार?

भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा,विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. हे तिन्ही खेळाडू सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ए प्लस कॅटेगरीत आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआय या तिन्ही खेळाडूंना ए प्लस कॅटेगरीतून बाहेर करु शकते. बीसीसीआयकडून खेळाडूंना मिळणारं मानधन हे त्यांच्या कॅटेगरीवरुन ठरतं. ए प्लस कॅटेगरीत असलेल्या खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com