Pat Cummins SRH Vs DC X
Sports

Pat Cummins : ३ ओव्हर्सच्या पहिल्याच चेंडूवर ३ विकेट्स; पॅट कमिन्सने दिल्लीचं कंबरडं मोडलं

SRH Vs DC : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना सध्या रंगला आहे. या सामन्याच्या सुरुवातीलाच पॅट कमिन्सने अनोखी कामगिरी केली आहे. त्याने ३ ओव्हर्सच्या पहिल्याच चेंडूवर ३ विकेट्स घेतल्या आहेत.

Yash Shirke

IPL 2025 मधील ५५ वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधाराने, पॅट कमिन्सने कमाल केले आहे. त्याने तीन ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली आहे, विशेष म्हणजे या ३ ओव्हर्सच्या पहिल्या चेंडूवर त्याने दिल्लीच्या फलंदाजांना बाद केले आहे. अशा प्रकारे पॅट कमिन्सने इनिंग्सच्या सुरुवातीलाच दिल्लीला ३ धक्के दिले आहेत.

पहिल्या ओव्हरमध्ये पॅट कमिन्सने पहिल्या चेंडूवर करुण नायरला बाद केले. इशान किशनने कॅच पकडून नायरला माघारी पाठवले. तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिस पॅट कमिन्सच्या जाळ्यात अडकला आणि तंबूत परतला. त्यानंतर कमिन्सने टाकलेल्या पाचव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूत अभिषेक पोरेल कॅचआउट झाला. योगायोग म्हणजे तिन्ही वेळेस ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाले, आणि तिन्ही विकेट्सच्या वेळेस विकेटकिपिंग करणाऱ्या इशान किशनने कॅच पकडली.

सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने गोलंदाजीतून स्वत:चा निर्णय किती योग्य होता हे सिद्ध केले. त्याने ३ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली आणि दिल्लीचे आघाडीचे ३ फलंदाज बाद केले. सामन्याच्या सुरुवातीलाच पॅट कमिन्समुळे दिल्लीच्या संघावर दबाव आला आहे.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन

इम्पॅक्टचे पर्याय - आशुतोष शर्मा, जेक फ्रेझर मॅकगर्क, समीर रिझवी, मुकेश कुमार, मोहित शर्मा

सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, इशान किशन, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, एशान मलिंगा

इम्पॅक्टचे पर्याय - ट्रॅव्हिस हेड, हर्ष दुबे, राहुल चहर, वियान मुल्डर, मोहम्मद शमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : नगराध्यक्ष कोण? निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपची ३-३ नावे, प्रदेशाध्यक्षांकडे यादी पोहचली

Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

Dadpe Pohe Recipe : नाश्त्याला बनवा चटपटीत दडपे पोहे, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

गौरव खन्ना की अमाल मलिक कोण उचलणार 'Bigg Boss 19'ची ट्रॉफी? सोशल मीडियावर कुणाच्या नावाची चर्चा

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT