टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर नव्या दमाचा भारतीय संघ श्रीलंकेत जाणार आहे. या दोन्ही संघात तगडी लढत होणार आहे. त्यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका होणार आहे. शनिवारी म्हणजेच २७ जुलैपासून ही लढाई सुरू होत आहे. गौतम गंभीर पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे आणि टीम इंडियासोबत तो पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर गेला आहे. आता हे सामने कुठे, कधी लाईव्ह बघता येणार याबाबत टीम इंडियाच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
टी २० वर्ल्डकप गाजवलेल्या हार्दिक पंड्याकडे टी २० संघाची धुरा देतील असं सर्वांनाच वाटत होतं. पण संघ व्यवस्थापनानं आश्चर्याचा धक्का देत टी २० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादव याच्याकडे नेतृत्व सोपवलं आहे. सूर्यकुमारने यापूर्वी ७ टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं आहे. त्यामुळं त्याच्यावर कुठलाही अतिरिक्त दबाव असणार नाही, हे स्पष्ट होत आहे.
ही मालिका सुरू होण्याआधी दोन्ही टीममधील काही खेळाडूंना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. टीम इंडियाचा मोहम्मद सिराज हा जायबंदी झाला आहे. मात्र त्याची दुखापत किती गंभीर आहे हे कळू शकलेले नाही. तर श्रीलंकेचा खेळाडू नुवान तुषारा आणि दुष्मंथा चमिरा हे दोघे आधीच मालिका खेळणार नाहीत. अशामध्ये टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. हा सामना कधी, कुठे खेळला जाणार आहे आणि कुठे पाहायला मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना शनिवार, २७ जुलै रोजी खेळवला जाईल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका पहिला टी- २० सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी अर्धा तास आधी मैदानात येतील.
तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना पाहू शकाल.
तुम्ही SonyLIV अॅपवर टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना कुठेही बसून पाहू शकता.
२७ जुलै - पहिला सामना संध्याकाळी ७ वाजता
२८ जुलै - दुसरा सामना संध्याकाळी ७ वाजता
३० जुलै - तिसरा सामना संध्याकाळी ७ वाजता
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.