Suryakumar yadav Saam TV
Sports

Suryakumar Yadav News: सूर्यकुमार यादव पुढच्या सामन्यात फिक्स शतक ठोकणार, एका फोटोमुळे चर्चांना उधाण

IPL News: सूर्यकुमारचा फॉर्म पुढच्या सामन्यात परतेल, असा दावा त्याच्या फॅन्सकडून केला जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023 News : टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा भरवशाचा खेळाडू सूर्यकुमार यादव सध्या मोठ्या अडचणीत आहे. सूर्यकुमार यादव अत्यंच खराब फॉर्ममधून जात आहे. सूर्यकुमारचा फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय बनलाय. मात्र सूर्यकुमारचा फॉर्म पुढच्या सामन्यात परतेल, असा दावा त्याच्या फॅन्सकडून केला जात आहे.

कारण 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील सामना संपल्यांतर सूर्या धोनीसोबत चर्चा करताना दिसला. सूर्यकुमार आपल्या खराब फॉर्मबाबत चर्चा करत असल्याचं बोललं जात आहे. कारण सूर्यकुमार प्रश्न विचारतोय तर धोनी (MahendraSingh Dhoni)  उत्तर देत आहे असं काहीसं चित्र दिसत होतं. मात्र दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मात्र सूर्यकुमारचे फॅन दोघांमधील चर्चेमुळे जबरदस्त खूश आहेत. आता पुढच्या सामन्यात सूर्यकुमार शतक ठोकेल अशी आशा त्याच्या फॅन्सना आहे. धोनी आणि सूर्यकुमारचा फोटो IPL ने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. त्यानंतर या फोटोवर सूर्याच्या फॅन्सच्या अनेक कमेंट्स येत आहे. एका फॅनने म्हटलं, पुढच्या मॅचमध्ये 100 फिक्स आहे. तर दुसऱ्या एका फॅनने म्हटलं की 50 धावा फिक्स.

IPL News

प्रत्यक्षात तसे घडले तर सूर्यकुमारसाठी ती मोठी दिलासादायक गोष्ट असेल. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग तीन सामन्यांमध्ये सूर्यकुमार शुन्यावर बाद झाला होता. तर त्याचा तोच खराब फॉर्म आयपीएलमध्येही (IPL)  दिसत आहे. दोन सामन्यात सूर्याने अवघ्या 16 धावा केल्या आहेत. पहिल्या दोन सामन्यात सूर्याने पहिल्या सामन्यात 15 आणि दुसऱ्या सामन्यात 1 धाव केली आहे.

सूर्यकुमारचा फॉर्म असाच कायम राहिला तर मुंबईच्या टीममधून त्याला कदाचित बाहेरही बसावं लागू शकतं. त्यामुळे सूर्यकुमार आपल्या फॉर्म परत आणण्यासाठी धोनीशी चर्चा करत असावा असा अंदाज बांधला जात आहे. मात्र यानंतर सूर्याचा फॉर्म परतेल का हे येत्या सामन्यात दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT