IPL 2023 MI vs CSK: मास्टरमाईंड धोनीपुढे रोहितसेना झाली फेल; पाहा मुंबई इंडिअन्सच्या पराभवाची मुख्य कारणं

MI Vs CSK Match: सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी राखून जोरदार विजय मिळवला आहे.
MI vs CSK
MI vs CSKSaamtv

Mumbai Indians Vs Chennai Super Kings: आयपीएल २०२३ (IPL) स्पर्धेतील १२ वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी राखून जोरदार विजय मिळवला आहे. मुंबईची ताकत ही फलंदाजी आहे मात्र बॅटर्सनेच सपशेल नांगी टाकली. त्यासोबतच काही अशीसुद्धा कारणं आहेत ज्यामुळे मुंबईने सामना गमावला. जाणून घेवूया मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवाची प्रमूख कारणे...

MI vs CSK
Ajinkya Rahane Records: तो 'अजिंक्य' आहे.. रेकॉर्ड ब्रेकिंग इनिंग खेळत रहाणेचे दमदार कमबॅक

सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने डावाची दमदार सुरूवात केली होती. ज्यावरुन रोहित सेना मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. मात्र काही षटकानंतर मुंबईचा डाव गडगडला. मुंबई संघाने एकदम झकास सुरूवात केली होती. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन यांनी चौकार षटकार मार आक्रमक सुरूवात करून दिली होती.

रोहितला तुषार देशपांडेने बोल्ड आऊट केलं त्यानंतरही ईशानने आपली फटकेबाजी कायम ठेवली होती. मात्र त्यानंतर संघाच्या 64 धावांवर ईशानला जडेजाने आपल्या जाळ्यात अडकवलं. ईशान मोठा फटका खेळण्याच्या नादात कॅच आऊट झाला. सामन्यातील ही विकेट टर्निंग पॉईंट ठरली. ईशाननंतर सूर्यकुमार यादव 1 धाव काढून आऊट झाला.

MI vs CSK
Ravindra Jadeja Catch : कॅमरून ग्रीनचा बुलेट शॉट, सर जडेजाचा जबरदस्त कॅच; अंपायर थोडक्यात वाचला, पाहा VIDEO

आता आशा होती ती म्हणजे युवा खेळाडू तिलक वर्मा याच्याकडून कारण मागील सामन्यातही त्यानेच शेवटपर्यंत फलंदाजी करत एकट्याने संघाला सन्मानजनक मजल मारून दिली होती. तिलक वर्माही बाद झाला, मुंबईचे मधल्या फळीतील भरवशाचे फलंदाज ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड यांनीही मोठी खेळी करता आली नाही. यामधील एका खेळाडूने जरी शेवटपर्यंत टिकून राहत फलंदाजी केली असती तर धावसंख्या १९० च्या आसपास गेली असती.

मुंबईच्या बॉलिंग विभागातही हुकमी एक्क्क्यासारखे गोलंदाज नाहीत. याआधी कमी स्कोर असतानाही कित्येकवेळा सामने जिंकून दिले आहेत. मात्र आज डेव्हॉन कॉनवेची सुरूवातीची विकेट गमावल्यावर  विकेट मिळवता आली नाही. अजिंक्य रहाणेने सामना पूर्णपणे मुंबईच्या पारड्यात झुकवला होता. त्याचप्रमाणे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MahendraSingh Dhoni) डावपेचांपुढे रोहित सेना कमकुवत ठरत गेली, ज्यामुळे मुंबईला हा पराभव स्विकारावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com