yogesh kathuniya twitter
Sports

Yogesh Kathuniya: डॉक्टर होण्याचं स्वप्न एका घटनेने बेचिराख झालं, आता अख्खं जग जिंकलं! योगेशची यशोगाथा वाचा

Yogesh Kathuniya Won Silver In Discus Throw: भारताचा पॅरा अॅथलिट .योगेश कथुनियाने पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरलं आहे.

Ankush Dhavre

आई वडिलांचं स्वप्न होतं की, मुलाने डॉक्टर व्हावं. मात्र वयाच्या ९ व्या वर्षी मुलगा पार्कमध्ये खेळताना पडला आणि पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहु शकला नाही. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला गिलियन-बरे सिंड्रोम आहे असं सांगितलं.

हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे जो शरीराच्या हालचालींमध्ये अडथळा आणतो. स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे त्याला पुन्हा स्वत: च्या पायांवर चालता येणार नाही, असं डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. परंतु योग्य ट्रिटमेंट घेऊन हा खेळाडू पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा राहिला आणि आता देशासाठी पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकही जिंकलं आहे.

आम्ही बोलतोय, भारतीय पॅरा अॅथलिट योगेश कथुनियाबद्दल. या भारतीय खेळाडूने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील थाळीफेक प्रकारात रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. योगेशने कधीच आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. यादरम्यान त्याच्या आईनेही अथक परिश्रम घेतले. त्याच्या आई त्याला स्कूटरवर बसवून डॉक्टरांना भेटण्यासाठी घेऊन जायच्या. हे अथक परिश्रम आणि योगेशची मेहनत अखेर यशस्वी ठरली.

कुटुंबासाठी अभिमानास्पद क्षण

कथुनिया कुटुंब २ सप्टेंबर हा दिवस कधीच विसरु शकणार नाही. बल्लभगड येथे राहणाऱ्या कथुनिया कुटुंबासाठी आनंदाचा क्षण होता. आपला मुलगा पॅरालिम्पिक स्पर्धेच्या थाळीफेक प्रकारातील (F56) फायनलमध्ये खेळण्यासाठी उतरला. फायनलमध्ये त्याने ४२.२२ मीटर लांब थाळी फेकत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं.

डॉक्टर बनायचं स्वप्नं होतं...

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या योगेशला डॉक्टर व्हायचं होतं. मात्र बालपणी घडलेल्या एका घटनेमुळे त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न स्वप्नचं राहिलं. योगेशचे वडिल कॅप्टन जियान चंद हे आर्मीमध्ये होते.

योगेशच्या वडिलांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, 'योगेश हा अतिशय हुशार आणि अभ्यासू मुलगा होता. आम्हाला त्याला डॉक्टर बनवायचं होतं. पण ९ वर्षांचा असताना तो पार्कमध्ये खेळायला गेला. त्यावेळी तो पडला. आम्ही क्षणाचाही विलंब न करता त्याला रुग्णालयात नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला गिलियन-बरे सिंड्रोम आहे असं सांगितलं. हे नक्की काय आहे, हे आम्हाला कळू शकलं नव्हतं. डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की, तो पुन्हा आपल्या पायावर चालू शकणार नाही. मात्र त्याच्या आईच्या चिकाटीमुळे आणि योगेशच्या जिद्दीमुळे हे शक्य होऊ शकलं आहे.' योगेशने मिळवलेल्या यशानंतर चहुबाजूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT